कोकणस्थ परिवार पुणेच्या वतीने राष्ट्रीय अंध क्रिकेटपटू दिनेश पाडळे याचा खास सत्कार

कोकणस्थ परिवार पुणेच्या वतीने राष्ट्रीय अंध क्रिकेटपटू दिनेश पाडळे याचा खास सत्कार
कोकणस्थ परिवार पुणेच्या वतीने राष्ट्रीय अंध क्रिकेटपटू दिनेश पाडळे याचा खास सत्कार

पुणे(प्रतिनिधि)–कोकणस्थ परिवार पुणे चे वतीने आज 15 ऑक्टोबर जागतिक अंध दिन निमित्त राष्ट्रीय अंध क्रिकेटपटू दिनेश पाडळे याचा खास सत्कार अंध क्रिकेट मधील वर्ल्ड चॅम्पियन अमोल कर्चे यांच्या हस्ते पंडित नेहरू स्टेडियम पुणे येथे करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ क्रीडा संघटक सुनील नेवरेकर होते .

दिनेश पाडळे हा मूळचा औरंगाबाद येथील रहिवासी असून त्याने दिल्ली, उत्तराखंड येथील अंधांचे राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे .सध्या तो स.प. महाविद्यालयात प्रथम वर्ष बी.ए .करत आहे याशिवाय तो सध्या पाऱ्या ओलंपिक ची तयारी करीत आहे. चंद्रकांत खराटे यांनी स्वागत केले सचिव पराग गानू  यांनी प्रास्ताविक केले. तर एडवोकेट दिनकरराव शिंदे यांनी उपस्थित त्यांचे आभार मानले.

अधिक वाचा  गुंड शरद मोहोळचा त्याच्या साथीदारांनी असा केला खात्मा : पहा व्हिडिओ

अक्षय पवळ ,संकेत शर्मा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love