ज्येष्ठ संस्कृतज्ञ वसंत अनंत गाडगीळ यांचे वृद्धापकाळाने निधन

ज्येष्ठ संस्कृतज्ञ वसंत अनंत गाडगीळ यांचे वृद्धापकाळाने निधन
ज्येष्ठ संस्कृतज्ञ वसंत अनंत गाडगीळ यांचे वृद्धापकाळाने निधन

पुणे(प्रतिनिधि)–पुणे येथील शारदा ज्ञान पीठमचे संस्थापक संस्कृत अभ्यासक वसंत अनंत गाडगीळ यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९५ व्या वर्षी पुण्यात निधन झालं. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा श्रीवर्धन गाडगीळ, सून आणि नातू असा परिवार आहे.

गाडगीळ हे झपाटलेलं व्यक्तिमत्व होतं. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संस्कृत विषयात पदवीपर्यंतचं अध्ययन, शारदा ज्ञानपीठाची स्थापना, संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी केलेला प्रयास आणि त्यासाठी अमेरिका, आफ्रिकेमध्ये अनेक वेळा त्यांनी प्रवास केला होता.

पं. वसंत गाडगीळ प्रत्येक वर्षी पुण्यात ऋषीपंचमी निमित्त ८० वर्षांवरील तपस्वी, विद्वान, निरनिराळ्या क्षेत्रांत सातत्यानं विधायक कार्य करणाऱ्या पुण्यातील व पुण्याबाहेरील नामवंत व्यक्तींचा सत्कार ते घडवून आणत. ते संस्कृत भाषे विषयी नेहमी आग्रही असतं.  ते भाषण संस्कृतमध्येच करीत असत. प्राचिन ग्रंथ वेद उपनिषदे यांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. संस्कृत भाषेच्या प्रचार प्रसारासाठी शारदा संस्कृत नावाने ते मासिक चालवत होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  डॉ. लक्ष्मण कार्ले यांच्या वतीने आयोजित नेत्रचिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद