निरोगी आणि तरुण असणाऱ्यांना २०२२ पर्यंत लसीची प्रतीक्षा करावी लागणार?


नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. काही लसीच्या अंतीम टप्प्यातील चाचण्याही सुरु आहेत. असा सर्व बातम्या सुरु असताना आता लस बाजारात आली की प्रत्येकजण ही लस आपल्याला मिळावी यासठी प्रयत्न करणार. परंतु, थांबा जरी लस बाजारात आली तरी ही लस निरोगी आणि तरुण असणाऱ्यांना २०२२ पर्यंत लसीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी हे म्हटले आहे. त्या  एका सोशल मीडिया कार्यक्रमात बोलत होत्या.

 स्वामीनाथन म्हणाल्या की लस बाजारात आल्यानंतर प्रथम ही लस आरोग्य कर्मचारी, फ्रंट-लाइन कामगारांना देण्याबाबत बहुतेक लोक सहमत आहेत. परंतु, त्यातही कोणाला सर्वात जास्त धोका आहे हे देखील परिभाषित करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये वयोवृद्ध प्राधान्याने असतील.

अधिक वाचा  सुलभ ईएमआय पर्यायांकरिता रूबी हॉल क्लिनिकचा बजाज फिनसर्व्ह हेल्थ सोबत करार :रूग्णांना योग्य आर्थिक साहाय्य व सवलत मिळण्यासाठी मेडिकार्ड सादर

 कोरोना लस पुढील वर्षापर्यंत उपलब्ध होईल असे सांगून स्वामीनाथन म्हणल्या की २०२१ पर्यंत किमान एक सुरक्षित आणि प्रभावी लस नक्की उपलब्ध होईल परंतु ती ‘मर्यादित प्रमाणात’ उपलब्ध होईल आणि म्हणूनच कमजोर व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल.

डब्ल्यूएचओने यापूर्वी असे म्हटले आहे की  ‘हर्ड इम्यूनिटी’ तयार होण्यासाठी  संक्रमण पसरवणे अनैतिक आहे आणि यामुळे अनावश्यक मृत्यू होऊ शकतात. संसर्ग पसरण्यापासून रोखण्यासाठी हात धुणे, सामाजिक अंतर, मास्क याचा वापर करणे आवश्यक आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love