टीआरपी’ घोटाळा:वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर तीन महिन्यांसाठी स्थगिती


नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—वाहिन्यांचा “टीआरपी’ घोटाळा समोर आल्यानंतर वाहिन्यांच्या विश्वासार्हतेबद्दल शंका घेतली जात असतानाच टीव्ही वाहिन्यांच्या कामकाजाचे मोजमाप करणाऱ्या   ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल’नं (BARC) एक मोठा निर्णय घेतला आहे. वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर तीन महिन्यांसाठी स्थगिती आणण्याचा निर्णय बार्कने घेतला आहे. बार्कने निर्णय जाहीर करताना टीआरपी मूल्यमापनाची सध्याची पद्धत आणि यंत्रणेतील दोष दूर करण्यासाठी काय करता येईल याचा आढावा घेणार असल्याचे सांगितले.

अधिकाधिक जाहिराती मिळविण्यासाठी  कृत्रिमरीत्या टीआरपी वाढवणाऱ्या वाहिन्यांचे बिंग फोडल्याचा दावा मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. हा आर्थिक गैरव्यवहार असून त्यात ‘रिपब्लिक’ या वृत्तवाहिनीसह ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ आदी वाहिन्यांचा सहभाग पुढे आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यावरून मोठे वादंग निर्माण झाले होते. दरम्यान, बार्कच्या निर्णयाचे न्यूज ब्रॉडकास्टिंग असोसिएशनकडून (NBA) स्वागत केले आहे. बार्कने योग्य दिशेने पाऊल टाकल्याची प्रतिक्रिया एनबीएने दिली.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  काश्मीरचा नवा अध्याय: जम्मू - काश्मीरचे अनेक शेतकरी आणि उद्योजकांचे नवनवीन प्रयोग