कोरोनावरील एक औषध देणार तीन विषाणूंपासून संरक्षण? वैज्ञानिकांचा दावा

आरोग्य
Spread the love

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—जगभरात थैमान घातलेल्या कोविड-१९ या विषाणूला प्रतिबंधित करण्यासाठी लस आणि औषध निर्मितीवर संशोधन सुरु आहे. काही देशांमध्ये ते अंतिम टप्प्यातही पोहोचले आहे. कोरोनावरची लस आणि औषधावर तयार करत असतानाचा वैज्ञानिकांनी आणखी एक धक्कादायक दावा केला आहे.

जगातील २०० शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार सार्स(SARS ) आणि मार्स (MARS) च्या विषाणूचे स्वरूपही कोविड -१९ विषाणूशी मिळते-जुळते आहे. हे तीनही विषाणू त्यांच्या स्पाइक प्रोटीनद्वारे मानवी पेशींवर हल्ला करतात आणि त्यांना संसर्गित करतात. त्यामुळे हे वैज्ञानिक जी औषधे किंवा उपचार शोधण्यात गुंतलेले आहेत, ते उपचार या तीनही विषाणूंपासून संरक्षण देऊ शकतात. कोविड-१९ प्रमाणेच अद्याप सार्स किंवा मार्सवर कुठलेही औषध बनविण्यात आलेले नाही.

सायन्स या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. सहा देशांमधील १४ संशोधन संस्थांमधील २००  शास्त्रज्ञांनी या संशोधनात भाग घेतला. त्यांनी अमेरिकेच्या ७.४ लाख कोरोनाबाधित रुग्णांच्या डेटाचे विश्लेषण केले आहे, ज्यामध्ये त्यांनी प्रथम या रुग्णांना  कोणती औषधे देण्यात आली त्याने त्यांच्या संसर्गात किती सुधारणा झाली याबाबत निरीक्षण केले आहे. या संशोधनाच्या आधारावर आता हे वैज्ञानिक कोविड-१९  तसेच सार्स, मार्स आणि भविष्यात पसरणाऱ्या सर्व प्रकारच्या कोरोना विषाणूंवर परिणाम करणारे औषध तयार करण्याचा प्रयत्न करतील.

संशोधनाच्या अहवालानुसार शास्त्रज्ञांनी कोविड -१९ आणि सार्स, मार्स विषाणूची एकसमान असुरक्षा ओळखली आहे, ज्याच्या आधारावर अँटी-व्हायरस थेरपीमुळे या व्हायरसला नष्ट करता येवू शकेल.

 कधी बनला कोरोना प्राणघातक?

सामान्य सर्दी कोरोना विषाणूमुळेच होते. त्याचा इतिहास खूप जुना आहे, परंतु पूर्वी ते प्राणघातक नव्हते. २००२ मध्ये कोरोना विषाणूचे उत्परिवर्तन झाले आणि सार्सची साथीचा रोग पसरला. त्यानंतर २०१२ मध्ये  मार्सची साथ पसरली आणि आता  कोविड -१९ ची साथ जगात पसरली आहे.  वैज्ञानिकांनी असा अंदाज वर्तविला आहे की कोविड -१९  नंतरही कोरोनाचे इतर भाग जगात विध्वंस घडून आणू शकतात. त्यावेळी या संशोधनाच्या मदतीने त्यांना प्रतिबंधित करण्यास मदत होईल.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *