News24Pune(ऑनलाइन टीम)–अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचे बुधवारी निधन झाले. अर्जेंटिनाच्या माध्यमांनुसार, मॅरेडोना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मॅराडोना गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते .
दोन आठवड्यांपूर्वी त्याच्या मेंदुमध्ये रक्ताची गाठ झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर आठ दिवसांनंतर मॅराडोनाला रुग्णालयातून सोडण्यात आले. तो घरी आराम करत होता.
डिएगो मॅराडोनाला आतापर्यंतचा महान फुटबॉलपटू म्हटले जाते. 1986 च्या अर्जेटिनाला फुटबॉल विश्वचषक जिंकण्यात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 1976 मध्ये मॅराडोनाने फुटबॉलच्या जगात प्रवेश केला. एक दशक नंतर, अर्जेन्टिनाने त्याच्या नेतृत्वात 1986 विश्वचषक जिंकला. यावेळी त्याने खेळाच्या इतिहासात दोन अविस्मरणीय गोल देखील केले.
अर्जेटिना येथे त्याचा पुतळा असून पुतळ्याची उंची 9 फूट उंच आहे यावरून या सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या उंचीचा अंदाज येतो.