धोतरावर सह्या करून राज्यपालांचा निषेध

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे–छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ स्वराज्य संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धोतरावर सही करून अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला. ‘राज्यपाल हटवा, स्वाभिमान वाचवा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देवून आंदोलन करण्यात आले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी न केल्यास येणाऱ्या काळात राज्यपालांचे कार्यक्रम उधळून लावू तसेच राजभवनाला कुलुप लावण्याचा इशारा यावेळी स्वराज्य चे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांनी दिला.

यावेळी स्वराज्य चे निमंत्रक गणेश सोनवणे, अमोल वीर, प्रणय शेंडे, डॉ. प्रविण कदम, संकेत सोनवणी, प्रविण भोसले, कुणाल शिंदे, हेमंत दाभाडे, गणेश गवळी, ज्ञानेश्वर बोबडे, प्रभात शिर्के, किसन थेऊरचा, दादाराव बोबडे , सुमित बोऱ्हाडे , तेजस धावडे व अनेक स्वराज्यचे कार्यकर्ते उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *