इंद्रायनी नदी पुन्हा फेसाळली

Indrayani river foamed again
Indrayani river foamed again

Indrayani River – मागील दोन दिवसांपासून इंद्रायणी नदी (Indrayani River) फेसाळली आहे. रसायनमिश्रित Chemical Mix) पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदी पात्रात सोडणे, मैलामिश्रित पाणी (Dirty water) नदीत सोडणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे इंद्रायणी नदी (Indrayani River) प्रदूषणाच्या ( pollution) विळख्यात अडकली आहे. यावर कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासन ठोस पावले उचलताना दिसत नाही. त्यामुळे अलंकापुरी आळंदीमध्ये (Alandi) येणारे वारकरी आणि आळंदीमधील नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे.(Indrayani river foamed again)

बुधवारी (दि. ३ ) सकाळी इंद्रायणी नदी (Indrayani River) सिद्धबेट बंधाऱ्याजवळ फेसाळलेली दिसली. तीच परिस्थिती गुरुवारी (दि. ४) देखील आहे. इंद्रायणीचे फेसाळलेले पाणी आळंदी मधील घाटांवर येते. वारकऱ्यांसाठी इंद्रायणी नदीचे महत्व खूप आहे. अनेकजण इंद्रायणीचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. अनेकजण या पाण्यात स्नान देखील करतात. यामुळे वारक-यांमध्ये पोटाचे विकार आणि त्वचा विकार देखील पसरण्याचा धोका आहे.

अधिक वाचा  नरेंद्र मोदींचे विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी भाजपच्या पाठीशी उभे राहा : आप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित स्नेहमेळाव्यामध्ये मान्यवरांचे आवाहन

इंद्रायणी नदीचे पाणी अनेक शेतकरी शेतीला देतात. रसायन मिश्रित पाणी शेतीला दिल्याने तिथे येणारा चारा आणि पिके यामुळे जनावरांसह माणसांना देखील धोका निर्माण झाला आहे. अनेकदा मृत माशांचा खच इंद्रायणी काठी पहायला मिळतो. कुपनलिकेत असे अशुद्ध पाणी येते, त्यामुळे ते पाणी पिणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आहे. इंद्रायणी नदी काठच्या गावांमध्ये जाऊन वारकरी संस्था आणि वारकरी संप्रदायातील मान्यवर इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्तीसाठी प्रयत्न करीत आहेत. तरीही त्यांच्या प्रयत्नांना यश आले नसल्याचे दिसत आहे.

प्रशासनाकडून मात्र यावर कोणतीही ठोस उपाययोजना केल्याचे दिसत नाही. केवळ कागदी घोडे नाचविण्यात प्रशासन मग्न आहे. इंद्रायणी नदी उगमापासून स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत कामे केली जाणार आहे. पण ती कामे होतील तेंव्हा होतील. आता सुरु असलेल्या इंद्रायणी प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. इंद्रायणी स्वच्छतेसाठी मोठमोठे उपक्रम राबवले जातात. मात्र ते सर्व उपक्रम इंद्रायणीच्या प्रदूषित पाण्यात वाहून जात असल्याचे दिसत आहे.

अधिक वाचा  आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे इव्हीएम मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा.. - अजित पवार

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा 577.16 कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल ऑगस्ट 2023 मध्ये राज्याच्या पर्यावरण विभागाकडे सादर करण्यात आला. राज्याने यास मान्यता दिली असून आता हा अहवाल केंद्राच्या राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाकडे (एनआरसीडी) सादर करण्यात आला आहे. एनआरसीडी कडून 60 टक्के अनुदान आणि राज्य शासन 40 टक्के अनुदान देणार आहे. येत्या दोन ते तीन वर्षात इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचे काम पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

एसटीपी प्लांट उभारणार

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पांतर्गत इंद्रायणी नदीच्या काठावर लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद, देहू नगरपंचायत, वडगाव नगरपंचायत, देहू कटक मंडळ, कुसगाव बुद्रुक, कामशेत-खडकाळे, इंदुरी ही 15 हजार पेक्षा अधिक लोकसंख्येची गावे, कार्ला, वरसोली, कान्हेवाडी तर्फे चाकण, येलवडी, आंबी, जांभूळ, कान्हे, गोळेगाव, सोळू, तुळापुर, मरकळ, नाणे, टाकवे बुद्रुक, सांगुर्डी, वडगाव शिंदे या 15 हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावांत एसटीपी प्लांट उभारले जाणार आहेत. उर्वरित 24 गावांमध्ये इन सेतू नाला ट्रीटमेंटचा वापर करून मैला शुद्धीकरण करण्याचे काम केले जाणार आहे. मात्र एसटीपी प्लांटच्या देखभालीचा खर्च मोठ्या प्रमाणात असतो, तो ग्रामपंचायतींना करणे शक्य होईल का. खर्च परवडत नसल्याने कोणतीही प्रक्रिया न करता पुन्हा मैलामिश्रित पाणी नदीत येण्याची शक्यता लक्षात घेत प्रशासनाने काम करणे गरजेचे आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love