आम्ही देवेंद्र फडणवीस या नावावर आता फुली मारली आहे – सुषमा अंधारे

आम्ही देवेंद्र फडणवीस या नावावर आता फुली मारली आहे
आम्ही देवेंद्र फडणवीस या नावावर आता फुली मारली आहे

पुणे(प्रतिनिधि)— उद्धव साहेबांना एका ताटात जरी घेऊन फडणवीस जेवले तरी आम्ही देवेंद्र फडणवीस या नावावर आता फुली मारली आहे, म्हणजे विषय संपला आहे. योगायोगाने आपल्याकडे लिफ्ट पाच-पन्नास नाही, त्यामुळे एकाच लिफ्ट मधून ते गेले की याचा अर्थ लगेच एकत्र आले असं नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना उबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली.

विधिमंडळात गुरुवारी  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समोरासमोर भेट झाली. त्यांनी एकाच लिफ्टने प्रवासही केला. यावेळी त्यांच्यात थोडाफार संवादही झाला. उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या या भेटीनंतर राजकारणात एकच खळबळ माजली. अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यावर सुषमा अंधारे यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

अधिक वाचा  शिवछत्रपतींवर बाबासाहेब पुरंदरेंइतका अन्याय दुसरा कोणी केलेला नाही: पुरंदरेंचं लिखाण कधीच पटले नाही- शरद पवार

चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पक्षाने आम्हाला विश्वासघाताचे विषारी घोट पाजले आहेत. हे विश्वासघाताचे विषारी घोट सुद्धा पचवून आम्ही परत उभे राहिलो आहे. माध्यमांसमोर जरी चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट दिले असले तरी आमची विनंती आहे की जनतेला आश्वासनांचे चॉकलेट देऊ नका, तुमच्या अशा चॉकलेटने आम्ही तुम्हाला जनतेबाबत प्रश्न विचारणार नाही या भ्रमात राहू नका, असंही त्या म्हणाल्या.

तुमच्या नोटिसा आम्ही डायपरसाठी वापरू : सुषमा अंधारे

पुण्यातले बेकायदेशीर पब आणि बार विरोधात कारवाईची मागणी करत सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत शिवसेना ऊबाठाच्या वतीने  गुरुवारी आंदोलन करण्यात आले.  राज्य शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांचा फोटो असलेल्या एका खोक्यावर ५० खोके असं लिहिलं होतं.  रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागावर केलेले आरोप खोटे असल्याचे म्हणत शंभूराज देसाई यांनी सुषमा अंधारे यांच्यासह रवींद्र धंगेकर यांना थेट अब्रुनुकसानीची नोटीस बजावली होती. या नोटीसीवर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या,  शंभुराजे देसाई तुमच्या धमकीला घाबरत नाही, तुमच्या नोटिसा आम्ही डायपरसाठी वापरू. कुठल्या तोंडाने तुम्ही नोटिसा पाठवत आहात. नोटिसी पाठवता मग  कारवाई का होत नाही,राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकारी तुमचे लागेबांधे आहेत.

अधिक वाचा  कॉँग्रेसशिवाय आघाडी झाल्यास तिला यश मिळणार नाही- पृथ्वीराज चव्हाण

सुषमा अंधारे म्हणाल्या, पुणे विद्येचे माहेरघर म्हटलं जाते,  पण आता याच पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पुण्यात फक्त अधिकृत २३ पब बार आहेत,  ज्याच्याकडे परवाना आहे. यादी  फक्त २३ बारची वाचली, मग १०० बार पब कोणाच्या आशीर्वादने चालतात हे आम्हाला माहीत आहे.

पुण्यातील पब, बारची माहिती आमच्याकडे आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभाग चरणसिंग राजपूत यांच्या अधिपत्याखाली कसे चालतात? याची माहिती आमच्याकडे आहे. चरणसिंग राजपूत यांचं निलंबन करून कारवाई केली पाहिजे, त्यांची चौकशी केली पाहिजे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love