कौतुकास्पद: गौरव घुले आणि मित्र परिवाराने उचलला खारीचा वाटा; महेश सोसायटीचा परिसर केला मोफत सॅनिटाइज


पुणे- पुण्यामध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील गृहनिर्माण सोसायटयांमध्ये जास्त प्रादुर्भाव होत असून अनेक सोसायटया मायक्रो कंटेनमेंट किंवा कंटेनमेंट झोन म्हणून म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. सोसायटया कंटेनमेंट झोन झाल्यानंतर नक्की काय काळजी घ्यायची याच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असल्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोणी प्रत्यक्ष काम करायला तयार नसतं. याचा प्रत्यय अनेक ठिकाणी येतो. बिबवेवाडी परिसरातील महेश सोसायटीही अशीच मायक्रो कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आली आणि सोसायटीमध्ये चिंता वाढली.

अशावेळी शासन तरी कुठपर्यंत मदत करणार आणि कधी महापालिकेचे कर्मचारी घराघरापर्यंत येऊन सॅनिटाइझ  करणार असा विचार करून गौरव घुले या युवकाने पुढाकार घेत आपल्या मित्रांच्या सहकार्याने हे काम हाती घेतले. स्वखर्चाने स्वतः आता समाजासाठी काम करायच आणि या समस्येतून आपल्या लोकांना आपणच बाहेर काढायच या जिद्दीने हा तरुण समाजकार्यासाठी बाहेर पडला आणि या कोरोनाच्या भयान संकटात लोकांसाठी कामे करू लागला.

अधिक वाचा  गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेला बाईक रॅली: पोलिसांची धरपकड

त्याची सुरुवात गौरव घुले यांनी स्वतः सॅनिटायझर घेऊन माणसे लावून प्रत्येक सोसायटीमध्ये बंगलो प्लॉट्स मध्ये तसेच काही सार्वजनिक ठिकाणी व ज्यांना गरज आहे त्यांना घरात महेश सोसायटी व परिसरातील नागरिकांना मोफत करून दिले. गौरव घुले आणि त्याचे सहकारी मित्र हे काम करताना लोकांना सॅनिटाइझेशन आणि मास्क लावण्याचे महत्व सांगून जनजागृतीही करीत आहेत.

आमच्या सारख्या युवकांनी आपापल्या भागात एक सामाजिक जबाबदारी म्हणून अशा प्रकारचे कार्य केले तर  कोरोनाचे संकट लवकर जाईल. अशा संकटाच्या काळात युवकांनी समाजासाठी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन गौरव घुले यांनी केले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love