शिवभोजन थाळी ठरली निराधारांसाठी वरदान..

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- कोरोना संसर्गाच्या काळात ज्यांचे पोट रोजच्या मोल मोलमजुरीवर आहे. त्यांची रोजीरोटी थांबली, त्यांच्या मदतीला अनेक सेवाभावी हात आले, शासनाच्या रेशनिंगमुळे अनेकांच्या पोटात अन्न गेले तसेच शिवभोजन थाळीमुळे अनेकांच्या जगण्याला मोठा आधार मिळत असल्याचे समोर आले आहे.

राज्य शासनाने सुरू केलेली शिवभोजन थाळी योजना गरजूंसाठी वरदान ठरली आहे. पुणे जिल्हयात 15 एप्रिल 2021 पासून 10 मे 2021 अखेर 74 केंद्रातून एक लाख 93 हजार 253 लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. कोरोना टाळेबंदीत ही योजना गरीब, गरजू आणि निराधारांसाठी वरदान म्हणून सिद्ध झाली आहे.      

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्वाकांक्षी योजना म्हणून शिवभोजन थाळीकडे पाहिले जाते. ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराधार, बेघर नागरिकांना रोजच्या जेवणाची सुविधा शिवभोजन थाळी योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी “शिवभोजन” थाळी योजना सुरू करण्यात आली. 26 जानेवारी 2020 पासून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री श्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्ह्यात या योजनेचा शुभारंभ झाला.  गतवर्षी टाळेबंदीच्या कालावधीत आधार ठरलेली ही योजना यावर्षीच्या टाळेबंदी कालावधीतही आधार ठरली आहे.

पुणे जिल्हयात शिवभोजन थाळींची तालुकानिहाय संख्या, कंसात शिवभोजन केंद्र

आंबेगाव- 14,599 (4), जुन्नर- 16,377  (7), खेड-8,390 (6), मावळ- 15,176 (6), मुळशी-8,012 (7), शिरूर-11,036 (5), भोर-14,979 (3), पुरंदर- 19,609 (4), वेल्हे- 3636 (1), दौंड-10,063 (5), बारामती-30,986 (13), इंदापूर-15,901 (5), हवेली- 24,490 (8) अशा एकूण 74 शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून 1 लाख 93 हजार 253 लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे.

शिवभोजन थाळी निराधारांसाठी वरदान म्हणून सिद्ध झाली आहे

‘‘पुणे जिल्हयात 15 एप्रिल 2021 पासून 10 मे 2021 अखेर 74 केंद्रातून एक लाख 93 हजार  253  लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. कोरोना टाळेबंदीत ही योजना गरीब, गरजू आणि निराधारांसाठी वरदान म्हणून सिद्ध झाली आहे.’’

भानुदास गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *