पुणे – ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्या प्रकरणी कन्नडचे माजी आमदार व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव (वय-43) यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
14 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता औंध येथील एका बँकेसमोर घडली. फिर्यादी यांचे आई-वडील सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून औंध वरुन जात होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या जाधव यांच्या मोटारीचा दरवाजा अचानक उघडला आणि चड्डा दांपत्य दरवाज्याच्या धक्क्याने खाली पडले. त्यानंतर झालेल्या वादानंतर जाधव यांनी दाम्पत्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली या आरोपाखाली हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली होती. त्यांना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्त्यांना नायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे जाधव यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील महिला आरोपी फरार असल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. परंतु, गुरूवारी त्यांना अंतरिम जामिन मिळवून दिला आहे. त्यामुळे त्या फरारी नसून याच ठिकाणी आहेत,” असं हर्षवर्धन जाधव यांचे वकील पठाण यांनी सांगितलं.
हर्षवर्धन जाधव यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. यावेळी त्यांची पोलीस कोठडीची मागणी राखून ठेवण्यात आली. परंतु त्यांना एका दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आम्ही जामिन अर्ज सादर केला. त्यानंतर न्यायालयानं सरकारी वकिल आणि आयओ यांचं म्हणणं मांडण्यास सांगितलं. त्यावेळी त्यांनी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून आम्हाला म्हणणं मांडण्यासाठी मुदत हवी असल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु न्यायालयानं त्यांना उद्याच म्हणणं मांडण्यास सांगितलं. जर उद्या म्हणणं मांडलं नाही तर उद्या जामिन अर्जावर सुनावणी करण्यात येईल,” असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.