राज्यसरकारने लसीकरण मोहिमेत विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे-दुर्गा ब्रिगेडची मागणी

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- राज्य सरकारने लसीकरणाबाबत नियोजन केलेले आहे. त्यात प्राधान्याने शासकीय वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे हे कौतुकास्पद आहेच परंतु त्यामध्ये पहिली ते दहावी विद्यार्थ्यांचा समावेश करावा अशी मागणी दुर्गा ब्रिगेड संघटनेने केली आहे.

याबाबतचे निवेदन पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना आज देण्यात आले. दुर्गा ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष दुर्गा भोर आणि पुणे शहर महिला उपाध्यक्ष भारती खाटपे ,पुणे युवा उपाध्यक्ष आकाश पाटील,युवा अध्यक्ष लोहगाव ऋषीराज तिरखुंडे , ऋषिकेश जाधव ,प्रथमेश कुसळकर यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.

राज्य सरकारने लसीकरणाबाबत नियोजन केलेले आहे त्यात प्राधान्याने शासकीय वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे हे कौतुकास्पद अस आहे परंतु त्यामध्ये पहिली ते दहावी विद्यार्थ्यांचा समावेश करावा जेणेकरून विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान चालले जाऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा मोठा प्रश्न मार्गी लागेल.  कारण शाळेमध्ये विद्यार्थी हे सामूहिकरीत्या मोठ्या कारण शाळेमध्ये विद्यार्थी हे सामूहिकरीत्या मोठ्या संख्येने एकमेकांचा डबा खाणे, पेन, पेन्सिल सारखी साधने वापरणे व एका वर्गामध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती म्हणजे हे धोकादायकच आहे.  परंतु विद्यार्थ्यांना प्राधान्याने लसीकरण दिल्यास हा धोका टाळता येईल यासाठी लसीकरण मोहिम प्रत्येक शाळेमध्ये करून विद्यार्थ्यांना प्राथमिक प्राधान्य द्यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *