महिलेला जबरदस्तीने दारू पाजून बलात्कार


पुणे -टिंडर अॅप्लिकेशनवरून ओळख झालेल्या मित्राने महिलेला हिंजवडी येथील एका हॉटेलवर नेऊन जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर महिलेला त्याच्या घरी नेऊन मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. ही घटना शनिवारी (दि. 26) दुपारी चार ते रात्री साडेअकरा या कालावधी घडली. पोलिसांनी आरोपी मित्राला अटक केली आहे.

अभिजित सीताराम वाघ (रा. तापकीर नगर चौक, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी अभिजित यांची टिंडर या अॅप्लिकेशनवरून ओळख झाली. त्या ओळखीचा गैरफायदा घेऊन अभिजित याने फिर्यादी महिलेला शनिवारी दुपारी चार वाजता हिंजवडी येथील एफ एम एल हॉटेलवर नेले. तिथे महिलेला जबरदस्तीने दारू पाजली.

अधिक वाचा  पुण्यामध्ये मिनी लॉकडाऊन:काय असणार निर्बंध?

त्यानंतर अभिजित याने फिर्यादी महिलेला त्याच्या घरी नेले. तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला असता महिलेने त्याला विरोध केला. त्यावरून अभिजित याने महिलेला लाथाबुक्क्यांनी, बुटाने व हाताने मारहाण करून डोळ्यावर, कानावर आणि तोंडावर मारून जखमी केले. मारहाण केल्यानंतर अभिजित याने महिलेवर बलात्कार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love