पुणे – देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाचा दीपस्तंभ ‘डेक्कन ह्रेरॅाल्ड’ची स्थापना थोर स्वतंत्रता सेनानी व स्वतंत्र भारताचे १ ले पंतप्रधान पं नेहरूंनी १९३० नव्हे तर १९३७ साली केली असून, हे वर्तमानपत्र ‘पारतंत्र्यातील भारतात’ स्वातंत्र्याची जागरूकता निर्माण करण्याकरता व स्वातंत्र्य संग्रामास प्रेरणा व दिशा देण्याकरीता ३ आवृत्त्यांमध्ये नॅशनल हेरॉल्ड (इंग्रजी), नवजीवन (हिंदी) आणि कौमीआवाज (उर्दू या तीन भाषांमध्ये) सुरू केले होते. फडणवीस ऊवाच् प्रमाणे १९३० साली कोणत्या ५,००० स्वातंत्र्य सैनिकांच्या’ मालकीची एजीएल (असोसिएट्ड जनरल लिमिटेड) स्थापन झाली? कोणत्या पध्दतीने ५,००० शेअर धारकांचे समभाग-(शेअर) यंग ईंडीया’च्या नावे ट्रान्सफर झाले? यांची पुर्ण तपशिलांसह माहीती भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी द्यावी,अन्यथा निर्लज्जपणे खोटे बोलून बकवास दीशाभूल करणारी विधाने केल्याबद्दल देशाची माफी मागावी अशी मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे.
स्वातंत्र्य पुर्व काळातील एजीएल ची स्थापना करणाऱ्या ५००० स्वातंत्र्य सैनिकांचा शोध घेण्यापेक्षा, १९२५ ते १९४७ मध्ये “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची व जनसंघाची” स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिशांच्या विरोधात कुठे व कोणती स्पष्ट कृतीशील भूमिका होती काय? याचा देखील शोध व बोध घ्यावा. अन्यथा स्वातंत्र्य संग्रामातील नाते प्रस्थापित करण्याकरता मोदी शहांच्या भाजपला सरदार पटेल, सुभाषबाबू बोसांचा वारसा प्रस्थापित करण्याची व दाखवण्याची केविलवाणी धडपड का करावी लागते असा सवालही त्यांनी केला.
जगाच्या ईतिहासात’ महात्मा गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद आदींच्या नेतृत्वाखालीच् भारतास स्वातंत्र्य मिळाल्याचीच नोंद आह,.परंतु दुर्दैवाने “स्वातंत्र्य संग्रामाविषयी” सतत अंतर ठेऊन, अनास्था बाळगणारेच आज स्वातंत्र्याचा दीपस्तंभ व साक्षीदार असलेल्या ‘नॅशनल हेरॉल्ड’चे व ते स्वातंत्र्य प्रेरणेने कृतीशील योगदान देणारे नेहरू-गांधी कुटुंबियांचे” राजकीय असुयेपोटी धिंडवडे काढण्यासाठी राजकीय हेतूने पुढे सरसावल्याचे स्पष्ट होत आहे. “स्वातंत्र्य भिकेत मिळाल्याचे “सांगणाऱ्या अभिनेत्रींना पद्मभूषण पुरस्कार देऊन, त्यांचे समर्थन करणाऱ्या भाजपाई सत्ताधाऱ्यांकडून स्वातंत्र्य लढ्याची उपेक्षाच पहावयास मिळते आहे, असे उपरोधिक वक्तव्य देखील कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.