Scam of six and a half thousand crores in health department

आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा घोटाळा – रोहित पवार : तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे—राज्याच्या आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा घोटाळा तर अॅंब्यूलन्स खरेदीत ५३९ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला झाल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पत्रकार परिषदेमध्ये जिवंत खेकडा दाखवला हा खेकडा आरोग्य विभागाला पोखरणाऱ्या खेकड्याचा प्रतीक असल्याचं रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले,  आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा घोटाळा झाला याला आरोग्य मंत्री जबाबदार आहेतच एक तर त्यांनी त्यांची खुर्ची सोडावी त्यांचे पद सोडावे.  ही फाईल पुढे पास कशी केली गेली? देवेंद्र फडणवीस साहेबांकडे ही फाईल जाते.त्यांमी दुर्लक्ष केलं का? साडेसहा हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे कोण जबाबदार आहे? असा प्रश्न आमच्या सगळ्यांचा आहे, असं ते म्हणाले.

५३९  कोटी रुपये अॅंब्यूलन्सच्या खरेदीच्या नावाखाली खात्याल आले. सुमीत फॅसिलिटी ही पिंपरी चिंचवडची कंपनी होती.  या कंपनीला अॅंब्यूलन्स चालविण्याचा अनुभव नव्हता.  मात्र तरीही मुख्यमंत्री दावोसला गेल्यावर एका स्पॅनिश कंपनीसोबत या सुमेत कंपनीचा करार करण्यात आला. मात्र त्यानंतर बी. व्ही. जी. या कंपनीने हे कंत्राट त्यांना मिळावे म्हणून प्रयत्न सुरु केले. त्यानंतर बी. व्ही. जी.चा देखील समावेश या कंत्राटात करण्यात आला, असंही ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, एका बाजुला बी. व्ही. जी. बाबत अनेक तक्रारी आहेत,  अनेक राज्यांत बी. व्ही. जी. ब्लॅक लिस्ट कंपनी आहे. मात्र तरीही या कंपनीला कंत्राट देण्यात आले. स्पॅनिश कंपनी ब्लॅक लिस्ट आहे .सुमित कंपनीने या कंत्राटासाठीचे निकष ठरवले आणि त्यानंतर स्वतःच टेंडर भरले.  काही दिवसांनी बी. व्ही. जी. ला सहभागी करून घेतले, असे अनेक आरोप त्यांनी केले आहेत. मी या मुद्द्यावर आरोग्य मंत्र्यांशी जाहीर चर्चा करायला तयार असल्याचं ते म्हणाले. शिवाय या भ्रष्टाचाराचा पैसा निवडणुकीत वापरण्यात येणार आहे, असा आरोपही त्यांनी केला.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *