शिवराज्याभिषेकदिन :हिंदू साम्राज्यदिन :[ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी (६ जून १६७४)]

महाराष्ट्र लेख
Spread the love

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी (६ जून १६७४) ‘शिवराज्याभिषेक दिन ’हा ‘हिंदू साम्राज्यदिन ’या नावाने ओळखला जातो. हिंदूंचे सार्वभौम सिंहासन स्थापन झाले तो दिवस. हिंदू समाजात अनेक उत्सव आहेत. त्यांच्या तिथी निश्चिजत आहेत. पण त्यात या नावाचा उल्लेख नाही, सण नाही, व्रत नाही. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला त्याचे स्मरण आपण करतो. वास्तविक पाहता आपल्या या प्राचीन देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी हजारो वर्षात मांधाता, रघु, चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, कृष्णदेवराव असे कितीतरी थोर सम्राट झाले. त्यांचे राज्याभिषेकही झालेले होते. परंतु तरीही शिवरायांच्या राज्याभिषेकाचेच स्मरण आपण का करतो?

जगातील श्रेष्ठ तत्त्वज्ञान, सर्वश्रेष्ठ संस्कृती, उच्च विज्ञान, जग जिंकू शकणार्याा महापराक्रमी वीरांची अखंड मालिका, स्वर्गातील देवतांनाही हेवा वाटावी अशी समृद्धी, असे वैभव- आणि हजारो वर्षांची परंपरा व इतिहास- इतके सगळे असूनही वारंवार आक‘मणे का होतात, समाज सातत्याने त्याचा प्रतिकार का करू शकत नाही, तो अधःपतित – विस्कळीत का होतो? या सर्वांचे कारण म्हणजे समाज आत्मविस्मृत झाला होता. त्याला त्याच्या सामर्थ्याची, शक्तीची जाणीव नव्हती, तो स्वतःची ओळख विसरला होता.  अशीच परिस्थिती १७ व्या शतकात कायम राहिली होती. असंघटित हिंदू समाजावर सतत मोघली आक‘मणे होत होती. अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांनी हिंदू समाज संघटित करून मुघलपातशाही व आदिलशही या दोन्ही महासत्तांना आव्हान दिले.

समाजाचे चैतन्य जागृत करणारा, आत्मविस्मृती दूर करणारा, शिवरायांचाच नव्हे तर आसेतुहिमाचल हिंदू समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा, प्रेरक प्रसंग कोणता ? तर तो राज्याभिषेकाचा. म्हणून त्या दिवसाचे स्मरण समस्त हिंदूंनी ‘हिंदू साम्राज्यदिन ’या स्वरूपात केले पाहिजे.

शिवरायांच्या काळात हिंदू समाजाला प्रचंड ग्लानी आली होती. भाऊबंदकी, देशद्रोह, फितुरी, स्वार्थ यांनी समाजजीवन बरबटले होते. ज्यांनी समाजाचे नेतृत्व करायचे तो ज्ञानी वर्ग आणि क्षत्रियवर्ग नीतीभ‘ष्ट, बुद्धीभ‘ष्ट झाला होता. कलियुग आहे, आता हिंदूंचा राजा होणे शक्य नाही, दि‘ल्लीच्या तख्‘ताचा बादशहा औरंगजेब हाच साक्षात् परमेश्वेर, अशी मानसिकता सर्व समाजाची झाली होती. हा बुद्धीभ्रंश हिंदू समाजाला अधिक धोकादायक होता.

हा बुद्धीभ्रंश दूरकरणे, सामान्य हिंदू माणसाच्या अंतःकरणात राष्ट्रप्रेम जागृत करणे हे कार्य सोपे नव्हते, जवळजवळ अशक्यप्रायच होते. परकीयांचा विरोध समजू शकतो. पण या कार्याला स्वकीयांचाच विरोध होता. ना सैन्य, ना शस्त्रे, ना पैसा. प्रबळ इच्छाशक्ती आणि जिजामातेचा आशीर्वाद या पलीकडे शिवाजी महाराजांजवळ काही नव्हते. अशा स्थितीत सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेवर मात करून हिंदूंचे स्वतंत्र सार्वभौम राज्य आणि सिंहासन निर्माण करण्याचा प्र’यत्न करणे हे एक मोठे साहसच होते. किशोरवयापासून त्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहायला सुरुवात केली. दोन हजार वर्षांपूर्वी आर्य चाणक्याच्या प्रेरणेने चंद्रगुप्ताने असे हिंदूंच्या वैभवसंपन्न, बलशाली राष्ट्राचे स्वप्न पाहिले होते व साकार केले होते. त्यानंतर शिवाजीमहाराजांनी ते ध्येय पुन्हा हिंदू समाजासमोर ठेवले.

हिंदू संस्कृतीत प्रत्येक गोष्टीला धर्माचे अधिष्ठान असते. हजारो वर्षांची प्राचीन परंपरा असलेला श्रेष्ठ हिंदू धर्म हा या स्वराज्याचा, शासनाचा पाया होतो. या पुण्यभूमीवर जन्म व्हावा अशी देवतांचीसुद्धा इच्छा असते. ईश्ववराचा वरदहस्त असलेले हे राष्ट्र आहे. हा सनातन विचार अगदी साध्या-सोप्या शब्दात शिवरायांनी प्रकट केला. ‘हिंदवी स्वराज्य ही ईश्व री इच्छा आहे ’ हे शिवाजी महाराजांचे विधान हा त्यांच्या कार्याचा प्रभावी मंत्र ठरला. राष्ट्रीय कार्याला धर्माचे अधिष्ठान मिळाले. अशा या ईश्व री कार्यासाठी सामान्य शेतकरी, कातकरी, सर्व जाती-जमातीतले लोक शिवरायांनी संग्रहित केले. त्यातूनच उत्तुंग नेतृत्व देणारी कर्तृत्ववान माणसे पुढे आणली. जिवाभावाने ती वाढविली, सांभाळली. प्रत्येक संकटाच्या, संघर्षाच्या प्रसंगी स्वतः शिवाजीमहाराज आघाडीवर राहिले. त्याबरोबरच त्यांनी मावळ्यांना त्यांच्या प्रचंड सामर्थ्याची जाणीव करून दिली.

‘राज्याभिषेक ’हा विषय काही शिवाजी महाराजांच्या इच्छेने समोर आला नाही. आपण राजा व्हावे यासाठी त्यांची ही खटपट नव्हती. हिंदू जनतेलाच आता आपला स्वतःचा राजा, हिंदू राजा हवा होता. पण सर्व प्रकारची अनुकूलता झाल्यावरही समाजातील काही स्वार्थी, क्षुद्र लोकांच्या दृष्टीने शिवराय बंडखोर होते, लुटारू होते. समाजाची दृष्टी बदलण्यासाठी शिवाजीराजांना शास्त्रोक्त राज्याभिषेक होणे ही काळाजी व समाजाची गरज होती.

आणि सर्वानुमते राज्याभिषेकासारखे शुभकार्य सिद्धीस न्यायचे ठरले. सुमारे एक हजार वर्षात असा हिंदू राजाच झाला नव्हता. ‘आपला राजा व आपले राज्य ’हे समाज विसरूनच गेला होता. शेकडो वर्षाच्या समाजाच्या आत्मविस्मृतीला धक्का देऊन त्याला त्यातून बाहेर काढण्याचे कार्य राज्याभिषेकातून होणार होते. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला रायगडावर, वेदमंत्रांच्या जयघोषात, काशीचे विद्वान आचार्य गागाभट्ट यांच्या पौरोहित्यात शेकडो वर्षानंतर प्रथमच हिंदू राजा छत्रपती शिवरायांच्या रूपाने सिंहासनावर आरूढ झाला. राज्याभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. ३२ मण सोन्याचे (१४ लाख रुपये मूल्य असलेले) भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. सोन्या-चांदीची फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मु‘ख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत‘ शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. गागाभट्टांनी उच्चरवाने दिलेल्या घोषणेला उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला –

प्रौढप्रताप पुरंदर,

क्षत्रियकुलावतंस,

गो-ब्राह्मणप्रतिपालक,

सिंहासनाधीश्वेर,

महाराजाधिराज

छत्रपति श्रीशिवाजीमहाराज की जय!

शिवाजी महाराजांनी एकूण सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती, रत्ने, वस्त्रे व शस्त्रे दान केली. हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्व,राच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सोन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रा’गडावरहीमिरवणूकजातअसतानासामान्यजनांनीफुले, चुरमुर, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.

शिवराज्याभिषेकाचा परिणाम असा झाला की, दिल्लीची मुघल सत्ता, विजापुरची आदिलशाही यांच्या प्रतिनिधींनी हिंदू सिंहासनासमोर मान तुकविली आणि नजराणे दिले. इंग‘जांच्या प्रतिनिधीनेही मान तुकविली. हिंदू समाजाची मानहानी संपली. औरंगजेबाला ज्यावेळी ही वार्ता कळली तेव्हा निराशेने तो उद्गारला, ‘काफराचे राज्य व्हावे ही खुदाचीच इच्छा दिसते.’ शिवरायांनी तेच म्हटले होते, ‘हिंदवी स्वराज्य’ व्हावे ही तो श्रींची इच्छा! ’शिवरायांच्या राज्याभिषेकाने हिंदू समाज खडबडून जागा झाला. त्यातूनच आसेतु हिमाचल झुंज देऊन मराठ्यांनी नंतरच्या काळात मुघलसत्ता पूर्ण नष्ट केली. कविराज भूषणांच्या ‘शिवाजी न होत तो सुन्नत होत सबकी ’या विधानाचे गांभीर्य मग लक्षात येते. हिंदूसमाजाचे चैतन्य शिवराज्याभिषेकाने जागृत झाले.

ज्या ज्या वेळी हिंदू समाजावर संकटे येतील, आक‘मणे होतील, अत्याचार होती त्या त्या वेळी हिंदूंना या सिंहासनाकडून प्रेरणा मिळेल हे या राज्याभिषेकाचे महत्त्व आहे.

प्रसन्न ज. खरे

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *