एकनाथ खडसे मुंबईत तर देवेंद्र फडणवीस खडसेंच्या घरी


जळगाव- काल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यांची ही भेट सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर फडणवीस यांनी आज मुक्ताईनगरमध्ये जाऊन खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. जेष्ठ नेते एकनाथ खडसे मुंबईत असताना फडणवीस यांनी थेट खडसे यांच्या मुकताईनगर येथील घरी जाऊन रक्षा खडसे यांची भेट घेतली. एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच जळगावला आले होते.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जळगाव भाजपला खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादी आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ग्रामपंचायतीचा निकालही भाजपच्या विरोधात गेला आहे तर माजी मंत्री गिरीश महाजन हेही पक्षातील पडझड रोखू शकलेले नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी खासदार रक्षा खडसे यांच्याबरोबर पक्षाच्या ‘डॅमेज कंट्रोल’ बाबत चर्चा केली असल्याचे बोलले जात आहे.

अधिक वाचा  फडणवीसांनी ‘बकवास व दीशाभूल करणारी मुक्ताफळें’ ऊधळू नयेत- गोपाळदादा तिवारी

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील नुकसान झालेल्या भागाची पाहणीही फडणवीस यांनी केली. पंचनामे लवकरात लवकर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत केली पाहिजे. विमा कंपन्यांचे लॉक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या रकमेचे 40- 80 टक्के पैसे मागत असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत असून शेतकरी अडचणीत असताना अशी सौदेबाजी करणाऱ्यांना पकडून जेलमध्ये टाकले पाहिजे असे ते म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love