रामदास आठवले म्हणतात याच्यासाठी केला खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश

राजकारण
Spread the love

पुणे– एकनाथ खडसे यांच्याकडे आमदारकी नसल्यामुळे ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तिथे त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, असे सांगतानाच त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये न जाता आरपीआयमध्ये यायला हवं होतं असं वक्तव्य केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

 आठवले यांनी गुरुवारी  बारामती तालुक्यातील कऱ्हा वागज गावामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

 आठवले म्हणाले, खडसे यांनी  राष्ट्रवादीमध्ये न जाता आरपीआयमध्ये यावे अशी अपेक्षा होती. मात्र,ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र,  खडसे यांच्याबरोबर भाजपचे १५,१६ आमदार जातील ही शक्यता त्यांनी फेटाळून लावली.

दरम्यान,  अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना  राज्य सरकाने तातडीने मदत करण्याची आवश्यकता  . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्राकडुन मदतीसाठी पत्र लीहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात सोलापूर, सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये मदत मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्राची मदत मिळण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *