प्रसिद्ध साहित्यिक व शिक्षण तज्ज्ञ डॉ. न.म. जोशी यांना अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा 2020 चा ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर


पुणे : सुप्रसिद्ध साहित्यिक व शिक्षण तज्ज्ञ डॉ. न.म. जोशी यांना अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा 2020 चा ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पाच हजार रूपये, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

जानेवारी 2021 मध्ये पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार  असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे यांनी सांगितली. अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेची गुरूवारी बैठक झाली. या बैठकीत जीवनगौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माधव राजगुरू, खजिनदार डॉ. दिलीप गरूड, कार्यवाह मुकुंद तेलीचरी, सहकार्यवाह सुनील महाजन, कार्यकारिणी सदस्य माधुरी सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते.

 डॉ. बर्वे म्हणाल्या, संस्थेतर्फे दरवर्षी बालसाहित्यात भरीव योगदान देणार्‍या व्यक्तीला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदाच्या पुरस्कारासाठी डॉ. न.म. जोशी यांची एकमताने निवड करण्यात आली. याआधी कै. लीलावती भागवत, कै. लीला दीक्षित, शंकर सारडा, यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. डॉ. न.म. जोशी यांचा गेली 65 वर्षे शिक्षण, साहित्य व संस्थात्मक कार्याशी संबंध आहे. त्यांनी 60 पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यापैकी 27 पुस्तके बालवाड्:मयाची आहेत. डॉ. जोशी यांनी 17 व्या अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. राज्य शासनासह अन्य महत्त्वाच्या साहित्य संस्थाचे अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. बालभारती, बालचित्रवाणी, शालान्त परीक्षा मंडळाच्या समित्यांवर त्यांनी तज्ज्ञ म्हणून अनेक वर्ष काम केले आहे. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  मोदी, मिर्दाल आणि ‘आयडिया ऑफ इंडिया’