या कारणामुळे वाढली पुणे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या,अजित पवार घेणार निर्बंध लावण्याबाबत निर्णय..


पुणे- पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रशासनाकडून वाढत्या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी काही उपाययोजना तर निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र, कोरोनाची अचानक वाढ कशी झाली? पुण्यात दुसरी लाट आली आहे का याबाबत प्रशासकीय पातळीवर मंथन सुरू असतानाच एक धक्कादायक कारण दोन संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. शहरातील शाळा आणि महाविद्यालये सुरू झाल्यामुळे पुणे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचा निष्कर्ष आयसर आणि टाटा इन्स्टिट्यूट या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत निर्बंधाबाबत निर्णय घेणार आहेत.  

पुण्यातील आयसर आणि टाटा इन्स्टिट्यूट या दोन संस्थांनी केलेआय सर्वेक्षणात शाळा आणि महाविद्यालये सुरू झाल्याने शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे म्हटले आहे. या संस्थांनी केलेल्या या पाहणी अहवालाचे  सादरीकरण विभागीय आयुक्तांसमोर करण्यात आले. त्यानंतर आता याच संस्थांना आता आणखी एक सूचना अहवाल तयार करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामध्ये पुण्यात पुन्हा लॉकडाऊन करावा लागू नये तसेच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी काय उपाय योजना करण्यात आल्या पाहिजेत? याबाबत अहवा देण्याचे सांगण्यात आले आहे.

अधिक वाचा  फितूर होऊन तरी भावाने काय मिळवलं?

येत्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीमध्ये या अहवालाच्या अनुषंगाने शहरात निर्बंध लावण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. कदाचित पुन्हा शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीतहो ण्याची शक्यता आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love