डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना उद्या न्यायालयात हजर करणार :एटीएसच्या तपासत अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता


पुणे–पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ((ATS) अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) (drdo) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर (Dr. pradeep Kurulkar) यांच्या एटीएस कोठडीची मुदत मंगळवारी (९ मे) संपणार आहे. कुरुलकर यांना मंगळवारी एटीएसच्या पथकाकडून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कुरुलकर यांची चौकशी तसेच त्यांच्याकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात मिळालेली माहिती एटीएसकडून न्यायालयात सादर केली जाणार आहे. एटीएसच्या तपास अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

एटीएसकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासाची माहिती न्यायालयात सादर केली जाणार आहे. कुरुलकरांची चौकशी तसेच त्यांनी तपासात दिलेली माहिती न्यायालयात सादर केली जाणार आहे. सुरक्षेचा भाग म्हणून कुरुलकर यांची गोपनीय ठिकाणी चौकशी सुरू आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेतील (रिसर्च अँड ॲनलिसिस विंग- रॉ) अधिकाऱ्यांकडून कुरुलकरांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासात मिळालेली माहिती तसेच पुढील तपासाचे मुद्दे याबाबतचा अहवाल एटीएसकडून न्यायालयात सादर केला जाणार आहे. त्यांच्याकडून मोबाइल संच आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. कुरुलकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. तपास अहवालातून अनेक धक्कादायक बाबी प्रकाशात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अधिक वाचा  अजितदादांसोबतचे आमदार आमच्या संपर्कात - जयंत पाटील यांचा दावा

कुरुलकर यांनी कार्यालयीन गोपनीय माहिती इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करून पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) गुप्तचर यंत्रणेला दिल्याचे तपासात आढळून आले आहे. कुरुलकर सध्या राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) कोठडीत आहेत. विशेष न्यायालयाने त्यांना मंगळवारपयर्यंत (९ मे) एटीएस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. कुरुलकर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात कसे सापडले, तसेच ते कोणाच्या संपर्कात होते याबाबत तपास करण्यात येत आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने त्यांना मोहजालात (हनीट्रॅप) अडकविल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कुरुलकर परदेशात पाकिस्तानी हेरांना भेटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे तसेच ते परराज्यातील काही जणांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. त्या दृष्टीने एटीएसकडून तपास करण्यात येत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love