‘डॉक्टर्स डे’च्या दिवशीच तरुण डॉक्टर दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- राष्ट्रीय ‘डॉक्टर्स डे’च्या दिवशीच पुण्यातील वानवडी भागातील तरुण डॉक्टर दांपत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. नवरा-बायकोमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर या दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.  

निखिल शेंडकर (वय 27) आणि अंकिता निखिल शेंडकर (वय 26) अशी आत्महत्या केलेल्या डॉक्टर पती-पत्नीची नावं आहेत. वानवडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बुधवारी संध्याकाळी डॉ. निखिल शेंडकर हे जेव्हा क्लिनिकमध्ये होते त्यावेळी फोनवरुन त्यांची त्यांच्या पत्नीशी वादावादी झाली. त्यानंतर रात्री निखिल शेंडेकर ज्यावेळी घरी परतले त्यावेळी त्यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं त्यांनी पाहिलं. यामुळे रात्रभर ते दु:खात होते, आणि त्यातच त्यांनी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.

डॉक्टर निखिल आणि पत्नी अंकिता शेंडकर यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले होते. हे दोघेही प्रॅक्टिसिंग डॉक्टर्स होते. काल सायंकाळी निखिल घरी येत असतानाच त्याचा फोनवरुन पत्नी अंकिताशी भांडण झालं झाला. हे भांडण इतकं विकोपाला गेलं की दोघांनी आरडाओरड केला आणि अखेर अंकिताने फोन ठेवून दिला. निखिल हे घरी आल्यावर अंकिता दरवाजा उघडत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा डॉ. अंकिता शेंडकर यांनी घरी पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यांनी रात्री आठ वाजता ही माहिती वानवडी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस त्यांच्या घरी पोहचले. त्यांनी अंकिता यांना खाली उतरवून ससून रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगितले. गळफास घेतल्याने मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह त्यांचा भाऊ ओमकार दत्तात्रय तळेकर (रा. उरुळी कांचन) यांच्या ताब्यात दिला. 

अंकिताने आत्महत्या केल्याने निखिलला मोठा मानसिक धक्का बसला. त्यानंतर त्यानेही ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. मात्र आत्महत्या करण्याइतके टोकाचे पाऊल उचलण्याइतका कोणता मोठा वाद या दोघांमध्ये झाला? ते फोनवरुन क्की कोणत्या कारणावरून भांडत होते, हे अद्याप समजू शकले नाही

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *