डॉ. बाबा आढाव यांची धंगेकर यांनी भेट घेऊन घेतले आशीर्वाद


पुणे- कॉंग्रेस पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मित्र पक्षाचे कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज ज्येष्ठ नेते व समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांची घरी जाऊन सदिच्छा भेट व आशीर्वाद घेतले.

त्यांच्यासोबत महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस वीरेंद्र किराड आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय बालगुडे होते. सध्या परीस्थित रवींद्र धंगेकर निवडून येणे गरजेचे आहे. त्यांना सर्व स्तरातून पाठींबा आहे, आमचाही पाठिंबा आहे. अनेक नागरी प्रश्न आहेत की जे धंगेकर सोडवतील असा आम्हाला विश्वास आहे. असे या प्रसंगी बाबा आढाव म्हणाले. त्यांनी यावेळी मतदार संघातील अनेक प्रश्नांचा उल्लेख केला. ‘या प्रत्येक प्रश्न लक्ष घालून ते सोडवण्याचा मी प्रयत्न नक्की करेन’ अशी खात्री रवींद्र धंगेकर यांनी यावेळी त्यांना दिली. याप्रसंगी हमाल पंचायतचे सरचिटणीस गोरख मेंगडे, उपाध्यक्ष दत्तात्रय डोंबाळे, व्यवस्थापक हुसेन पठाण, सहचिटणीस विनोद शिंदे, संघटक संदीप मारणे, रिक्षा पंचायतीचे व्यवस्थापक रांजणे, राहुल नागावकर, टेम्पो पंचायतीचे सरचिटणीस संपत सुकाळे, पथारी व्यावसायिक पंचायतीचे सरचिटणीस मोहन चिंचकर, महिला अध्यक्षा नीलम अय्यर, महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मोहन वाडेकर,  सहसचिव ओंकार मोरे आदी उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  पवारांचा शिवसेनेला आणि सामनाला आताच पुळका कसा आला?-नारायण राणे