सकारात्मक योजना व पाठपुराव्यानेे विद्यार्थ्यांच्या पदरी येईल यश

पुणे-मुंबई शिक्षण
Spread the love

पुणे- “दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेस जागरूक आणि सजग पालकत्वाच्या भूमिकेला अनन्य साधारण महत्व असते. त्यामुळे पालकांनी हेतुपुरस्सर योजना करणे, सकारात्मकतेने पुढे जाणे, प्रार्थनापूर्वक तयारी करणे आणि प्रति पाठपुरावा करणे आवश्यक आहे. या चतुःसुत्रीने विद्यार्थ्यांच्या पदरी नक्कीच यश येईल.” असा सल्ला शिक्षण तज्ञ व टाकळकर क्लासेसचे केदार टाकळकर यांनी दिला.

लायन्स क्लब पुणे डिजिटल आणि टाकळकर क्लासेस यांच्या तर्फे ‘पालकत्व १०वींच्या विद्यार्थ्यांचे’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते पालकांना काउंसिलींग करीत होते. टिळक स्मारक मंदिरात आयोजित कार्यक्रमात संचालक किशोर पाटील व हस्ताक्षर तज्ञ डॉ. नवनीत मानधनी उपस्थित  होते. या सेमिनारमध्ये हजारो पालकांनी सहभगा दर्शविला होता.

किशोर टाकळकर म्हणाले,“ या काळात विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचारधारेने हार्ड वर्क, स्टडी मेथड व पेपर राडटिंगचा अधिक सराव करावा. पालकांच्या बोलण्यातून व वागण्यातून नकारात्मक विचार येऊ देऊ नका. तसेच त्यांवर अधिक लक्ष केंद्रीत करू नका. पालकांनी आपले नियम मुलांवर लादू नये व तनाव देऊ नये. असे झाल्यास पाल्यांचे शारीरिक व मानसिक विकासात बाधा येते. मुलांच्या मनात  आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पालकांनी सदैव आपला चेहरा हसरा ठेवावा.”

“ या काळात मुलांचे सोशल कॉन्टॅक्ट कमी करावे, टीव्ही व मोबाइल पासून दूर ठेवावे. त्यांना रोज १ तास स्वतःसाठी दयावा, तसेच जो छंद असेल त्याची जोपासणी करावी, त्यांना रोज रात्रीची ८ तास पूर्ण झोप दयावी. घरातील वातावरण शांत व स्वच्छ असावे. जेव्हा मुलांचा मुड चांगला असतो तेव्हा रिडींग व लर्नींग घ्यावे आणि कंटाळा आला की राइटिंग करावे. लिखाणामुळे मेंदूला ताण पडतो व त्यातनू ब्रेन शार्प होतो.  त्यांना रोज हेल्दी फूड देऊन जंक फूड पूर्णपणे बंद करावे. सर्वात महत्वाचे त्यांच्या मेंदूला अभ्यासाचा ताण दयायची सवय लावणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त पाणी पिण्याची सवय लावावी. तसेच श्वासाचे योगासन शिकवावे असाही सल्ला त्यांनी दिला.”

डॉ. नवनित मानधनी म्हणाले, “आपल्या सहीने व्यक्तिमत्वचा परिचय होतो. मुलांनी हस्ताक्षर करतांना स्पेस देऊ नये, प्रेशर देऊन सहीं करू नये त्यावरून समोरच्या रागीट स्वभाव आहे ही गोष्ट लक्षात येते. एक उत्तम सहीं म्हणजे आपल्या भाषेत स्वतःचे नाव, वडिलांचे नाव व आडनाव असे लिहावे. तसेच सर्व नावांचे आद्य अक्षर मोठे असावे. खालून मारलेली रेषा १५ ते ३० डिग्री वर असावी. त्यातून मुलांचे व्यक्तिमत्व निखारेल.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *