पुणे- भाजपने निवडणुकपुर्व दिलेली “बस हुई मेहंगाई की मार.. बस हुआ नारीपर अत्याचार.. अब की बार मोदी सरकार…, कालाधन लाकर हर एक को १५ लाख देंगे… ,किसानों की आमदनी दुगनी करेंगे, एमएसपी बढाकर किसानों का कर्ज माफ करेंगे…, हरसाल २ करोड रोजगार देंगे…, रूपये की गिरती साख पर.. बस हुआ भ्रष्टाचार… अब की बार मोदी सरकार”.. इ आश्वासने व घोषणांचा भाजपच्या मोदी-शहा या नेत्यांना ‘विस्मरणात गेल्याने’ विसर पडला की काय? असा सवाल करत भाषणजीवी प्रधान सेवकांनी लाल किल्यावरून केलेली भाषणे व त्या अपेक्षापुर्तींच्या मुदती ऊलटून गेल्या मात्र जनतेच्या पदरी नैराश्या शिवाय काहीच पडलेले नाही. ही ‘भाजपची जनतेप्रती दगाबाजी नाही काय’? असा संतप्त सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई-दौऱ्या प्रसंगीच्या ‘राजकीय दगाबाजीच्या वक्तव्यावर’ केला आहे.
तिवारी म्हणाले, “जीएसटी व नोटबंदी”चे अपेक्षीत परीणामांसाठी’ भाषणजीवींनी मागीतलेला अवधी देखील ऊलटून गेला आहे. एकतर ‘महाराष्ट्राच्या सत्तेचा’ सुरत – आसाम मध्ये बाजार मांडून, घोडेबाजार करत, असंविधानिक पध्दतीने व लोकशाही मुल्यांना तिलांजली देत, केंद्रीय सत्तेचा गैरवापर करून, छिनाछिपटीने ‘महाराष्ट्राचे मविआ सरकार पाडण्याचे ‘दगाबाजीचे पाप’ भाजपनेच् प्रथम केले. कारण ‘राज्यपालांना हाताशी धरून, राज्यातील सत्ता ऊलथवण्याचे नाट्य आजही सुप्रिम कोर्टात कायदेशीर वैध ठरवले गेलेले नाही’..
मात्र., ऊल्टा चोरांच्या ऊलट्या बोंबा” या ऊक्ती नुसार, शिरजोरपणे व सोईने अर्थ लावून शिवसेनेसच् दगाबाज संबोधून व त्यांचेवर बदनामीचे शिक्कामोर्तब करण्याचा डाव करत असतील तर तो त्यांच्या पुर्वीच्या मित्र पक्षांच्या आमदारांनाच लखलाभ होवो. मात्र, त्या निमित्ताने “भाजपने जनतेप्रती केलेली दगाबाजी. अमितभाईंना दिसत व स्मरत नाही काय.? असा उपरोधिक सवालही गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केला आहे.