दिलीप वळसे पाटील पाय घसरून पडले : गंभीर दुखापत

Dilip Valse Patil fell down
Dilip Valse Patil fell down

Dilip Valse Patil : राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील काल रात्री राहत्या घरी पाय घसरून पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. वळसे पाटील यांना हात, पाय आणि पाठीला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर पुण्यातील औध येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वळसे पाटील यांची सध्या प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने सुमारे १५ दिवस रुग्णालयात उपचार सुरु रहातील असा अंदाज आहे.

वळसे पाटील यांच्या खुब्याला मार आणि हाथ फ्रॅक्चर झाला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांची महत्वाची भूमिका आहे. मात्र ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडवरच त्यांचा अपघात झाला आहे. वळसे पाटील यांनी ट्विट करुन त्यांनी ही माहिती दिली आहे.

अधिक वाचा  आणि.. डॉ.अमोल कोल्हे हे चक्क आढळराव पाटलांच्या पाया पडले

लवकरच सामाजिक कामात सक्रिय होईल!

‘काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल’, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.

लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. महायुतीचे उमेदवार अजून जाहीर झाले नाहीत. बारामती, मावळ आणि शिरुर या तिन्ही लोकसभा मतदार संघात उमेदवार कोण अशा चर्चा सुरु आहे. अजित पवार गटातून या लोकसभा मतदार संघात उमेदवार देण्यात येणार आहेत. या तिन्ही लोकसभा मतदार संघाची जबाबदारी पक्षाचे तगडे नेते म्हणून वळसे पाटलांवर आहे. मात्र ऐन निवडणूक तोंडावर आली असताना आणि प्रचार सुरु करायच्या आधीच वळसे पाटलांचा अपघात झाला आहे. त्यामुळे वळसे पाटलांना आता घरातूनच सुत्र हालवावी लागण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  आठवणी २६ नोव्हेंबरच्या ..कहाणी एका अज्ञात नायिकेची

शिरुर लोकसभा मतदार संघातून आढळराव पाटलांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यातच आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी वळसे पाटीलदेखील उपस्थित होते.  या मतदार संघाची  वळसे पाटलांवर मोठी जबाबदारी आहे. शिवाय अमोल कोल्हेंना पराभूत करण्यासाठी अजित पवार गटातील प्रत्येक नेत्याने शिरुरकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. मात्र याच काळात आता वळसे पाटलांवर आपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. शस्त्रक्रिया केल्यावर त्यांना डॉक्टर किती दिवस आरामाचा सल्ला देतात?, हे बघावं लागणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love