युवक काँग्रेसचे १०ते१२ जुलैला बंगळुरूमध्ये महाअधिवेशन

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे : “भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महाअधिवेशन १० ते १२ जुलै २०२३ या कालावधीत बंगळुरूमध्ये होणार आहे. या महाअधिवेशनची संकल्पना ‘बेहतर भारत की बुनियाद’ अशी असून, पाच ते सहा हजार युवा पदाधिकारी सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातून युवक काँग्रेसचे ५००-६०० पदाधिकारी महाअधिवेशनाला जाणार आहेत,” अशी माहिती भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एहसान खान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत पुणे शहर काँग्रेस प्रभारी विजयसिंह चौधरी, राष्ट्रीय सरचिटणीस वैष्णवी किराड, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाट, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, महाराष्ट्र प्रदेश सचिव राजू ठोंबरे, सचिव रोहित बहिरट, पुणे शहर उपाध्यक्ष सौरभ अमराळे, पुणे शहर सचिव सचिन सुडगे आदी उपस्थित होते.

एहसान खान म्हणाले, “भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरु, राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांच्या नेतृत्वात हे महाअधिवेशन होणार आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, युवकांचे नेते माजी खासदार राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे इतर अनेक मान्यवर नेते मार्गदर्शन करणार आहेत. २०२४ मध्ये होऊ घातलेली लोकसभा निवडणूक, त्यात युवक काँग्रेसचा सहभाग व युवकांवरील जबाबदारी यासह देशातील विविध समस्यांवर विचारमंथन व्हावे, युवकांचे प्रश्न मांडण्यासाठी मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने हे तीन दिवसांचे अधिवेशन महत्वाचे आहे. कर्नाटकातून ऊर्जेचा संचार पूर्ण देशभरात होणार असल्याने हे अधिवेशन बंगळुरूमध्ये होत आहे.”

राहुल शिरसाठ म्हणाले, “पुणे शहरातून युवक काँग्रेसची अधिकाधिक ताकद राहुल गांधी व काँग्रेस पक्षाच्या मागे उभी करण्यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत. या अधिवेशनाला पुण्यातून ७०-८० पदाधिकारी सहभागी होणार आहेत.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *