मार्क वाढवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थिनिकडे शरीर सुखाची मागणी: शिक्षकाला चोप देत काढली धिंड


पुणे-इयत्ता 12 वी मध्ये मार्क वाढवून देण्याचे आमिष दाखवत 11 वी मध्ये शिकणाऱ्य विद्यार्थिनिकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाच्या तोंडाला काळं फासून आणि चोप देत  संबंधित मुलीच्या पालकांनी आणि नातेवाइकांनी त्यांची धिंड काढली. या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा शिक्षक 11वी मध्ये शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील भाषेचा वापर करत होता. तसंच 12वी मार्क वाढवून देतो, पैसे देतो फक्त तुला शारीरिक संबंध ठेवावे लागतील, अशी मागणी या शिक्षकाने केल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केला आहे. मुलीने या प्रकाराची माहिती आपल्या पालकांना सांगताच त्यांनी संबंधित शिक्षकाला काळं फासून, त्याला चांगलाच चोप दिला आणि त्यांची धिंड काढली.  त्यानंतर त्या शिक्षकाला फरासखाना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा  काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

दरम्यान, भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही पुण्यातील या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. राज्यात अशा विकृती वाढत असल्याचं सांगत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ’11वी मध्ये शिकत असलेल्या मुलीला 12वी ला मार्क वाढवून देतो व पैसे देतो फक्त तुला शारीरिक संबंध ठेवावे लागतील अशी शिक्षकाकडून विद्यार्थिनीला मागणी करण्याची संतापजनक व लज्जास्पद घटना पुण्यात घडली. असल्या घटनांच सत्र राज्यात सुरू आहे. जनता वाऱ्यावर आणि सत्ताधारी एकमेकांना सांभाळण्यात दंग आहेत’, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love