A 16-year-old school boy was brutally beaten and his naked video went viral on social media.

वहिनीला फिरायला नेऊन शरीर सुखाची मागणी : तीने नकार दिल्यानंतर गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून खून

क्राईम
Spread the love

पुणे-पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मित्रासोबत मज्जा मारण्यासाठी स्वतःच्या वहिनीला नेवून, तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र, त्यास वाहिनीने नकार दिल्यानंतर गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मावळ येथील देहूरोड हद्दीत असलेल्या जुना पुणे मुंबई महामार्गावरील घोरावडेश्वर डोंगरावर आज (सोमवार) पहाटे उघडकीस आली.

याप्रकरणी एका युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिताली धडस(वय 19) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर तुकाराम धडस याला अटक केली आहे. तुकाराम हा मितालीचा चुलत दीर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार; तुकारामच्या मित्राने फोन करुन आपण बुधवार पेठेत जाऊन मज्जा करूया असे सांगितले. त्यावर तुकारामने मित्राला येथेच मज्जा करू, मी सर्व व्यवस्था केली आहे असे सांगितले. आरोपी तुकाराम दडस याचे मितालीशी एकतर्फी प्रेम होते. रविवारी तुकाराम दडस मितालीला घेऊन घोराडेश्वर येथे देवदर्शनासाठी डोंगरावर गेला होता. मितालीला पुढे घडणाऱ्या घटनेची काहीच कल्पना नव्हती. निर्मनुष्य आणि दाट झाडीत गेल्यानंतर आरोपीने मितालीकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र, त्याला मितालीने विरोध केला. याचाच राग मनात धरून तुकाराम दडसने मितालीचा गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून खून केला आणि तेथून धूम ठोकली.

दरम्यान, सोमवारी मयत मिताली यांचे पती सोमनाथ यांनी पोलिसात येऊन चुलत भावाने मितालीसोबत घातपात केला असल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. तेव्हा, त्यानेच मितालीचा खून केला असल्याचं उघड झाले. याप्रकरणी आरोपी तुकाराम दडस याला तळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *