प्रेयसीने चाकूने सपासप वार करत केला प्रियकराचा खून


पुणे— अभ्यासासाठी प्रियकराच्या रूमवर गेलेल्या प्रेयसी आणि प्रियकराचे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर झटापटीत झाले. चिडलेल्या प्रेयसिने घरातील भाजी चिरण्याच्या चाकूने प्रियकरावर सपासप वार करत त्याचा खून केला. ही धक्कादायक घटना पुण्यातील वाघोली परिसरात घडली आहे. दरम्यान, या घटनेत प्रेयसीलाही चाकू लागल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.

यशवंत मुंडे (वय २२ ,रा. लातूर ) असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. तर आकांक्षा पन्हाळे (वय २१ ,रा. अहमदनगर) असे जखमी झालेल्या प्रेयसीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत मुंडे आणि आकांक्षा पन्हाळे हे दोघेही वाघोली परिसरातील रायसोनी कॉलेजमध्ये डाटा सायन्स या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. सध्या महाविद्यालयाची परीक्षा असल्याने ते दोघे एकत्रित अभ्यासकरत होते. रविवारी रात्री आकांक्षा पन्हाळे ही तरुणी यशवंत मुंडे याच्या रायसोनी कॉलेजजवळ खोलीवर अभ्यास करण्यासाठी आलेली गेली होती. दरम्यान, सोमवारी पहाटे दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वादविवाद झाला. परंतु, तो विकोपाला गेला आणि रागाच्या भरात  आकांक्षा हीने स्वयंपाक घरात जाऊन भाजी कापण्याचा चाकू हातात घेत यशवंत याच्यावर चाकूने वार केले. या घटनेत गंभीरजखमी झालेल्या यशवंत मुंडे याचा मृत्यू झाला आहे. तर या भांडनाच्या झटापटीत आकांक्षा ही सुद्धा जखमी झाली असून तिला उपचारकरीता वाघोली परिसरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिक वाचा  जेष्ठ साहित्यिक, निसर्ग कवी ना. धों. महानोर यांचे पुण्यात निधन

याबाबतची माहिती मिळताच, लोणीकंद पोलिस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मयत यशवंत मुंडे याचा मृतदेह ताब्यात घेऊन ससूनरुग्णालयात शवविचछेदनासाठी पाठवला तर, आकांशा हीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबतचा पुढील तपास लोणीकंद पोलिस करत आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love