#धक्कादायक:एमडी डॉक्टरनेच लावले महिला डॉक्टरच्या बेडरुम आणि बाथरुममध्ये छुपे कॅमेरे

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे-पुण्यातील भारती विद्यापीठ कॅम्पसमधील स्टाफ क्वार्टरमध्ये राहणाऱ्या एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बेडरुम आणि बाथरुममध्ये छुपे कॅमेरे लावल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. हे कॅमेरे याच विद्यापीठातील एका एम. डी. डॉक्टरने लावल्याचे तपासात निष्पन्न झाले असून या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. डॉ. सुजीत जगताप (वय 42) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. या प्रकाराने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

पीडित महिलेने याबाबत 6 जुलै 2021 रोजी तक्रार नोंदवली होती. पीडिता सकाळी 8:45 वाजता नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास रुममध्ये परत आल्यावर तिला बाथरूम आणि बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावले असल्याचे निदर्शनास आले होते.

आरोपी डॉ. सुजित जगतापला आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठाडी सुनावली आहे. डॉक्टरने हा छुपा कॅमेरा असणारा बल्ब अमेझॉनवरुन मागवला असल्याचं समोर आलं आहे.  31 वर्षीय डॉक्टर महिलेच्या स्टाफ क्वार्टरमधील बेडरुम-बाथरुममध्ये हिडन स्पाय कॅमेरा सापडला होता.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश दिले होते. अशाच प्रकारचे किती गुन्हे आरोपीने केले आहेत, याची माहिती मिळावी, याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना नीलम गोऱ्हे यांनी निवेदन दिले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *