पुण्यात डेल्टा प्लसचा शिरकाव : पहिला रुग्ण सापडला


पुणे—मुंबई पाठोपाठ पुण्यातही डेल्टा प्लसने  शिरकाव केला आहे. मुंबईत शुक्रवारी डेल्टा प्लसमुळे एका महिलेच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर आता पुणे शहरातही डेल्टा प्लसचा रुग्ण सापडला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील डेल्टा प्लसच्या एकूण संख्या शनिवारी दुपारपर्यंत सहा इतकी झाली होती.

राज्यात झालेल्या सर्वेक्षणात कोरोना चाचणी केलेल्या 80 टक्क्यांहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळून आला आहे. दरम्यान, ‘डेल्टा प्लस’ बाधितांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून यात रत्नागिरीतील दोन, तर मुंबई, बीड आणि रायगड येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ठाणे जिल्ह्यात आणखी एका डेल्टा प्लसच्या रुग्णाची नोंद झाली असून राज्यात डेल्टा प्लस बाधितांची एकूण संख्या ६६ झाली आहे. बाधितांपैकी दहा जणांनी करोना लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत.

अधिक वाचा  इंडियनऑईलकडून प्लॅटिनम फ्लीट ग्राहकांशी संवाद :पर्यावरणास अनुकूल इंधनाच्या वापराला प्रोत्साहन

डेल्टा प्लसने मृत्यू झालेले पाचही रुग्ण ६५ वर्षांवरील होते आणि त्यांना अतिजोखमीचे आजार होते. या पाच जणांपैकी दोन जणांनी कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या होत्या, तर दोघांनी कोणतीही लस घेतेलेली नव्हती. मृत्यू झालेल्या एका रुग्णाच्या लसीकरणाबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही, असे आरोग्य विभागाने सांगितले.

ठाणे जिल्ह्यात ५० वर्षांच्या महिलेला डेल्टा प्लसची बाधा झाल्याची माहिती राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने शुक्रवारी दिली. या महिलेस २२ जुलैला करोनाची बाधा झाली होती आणि आता ती बरीदेखील झाली आहे. आत्तापर्यंत आढळलेल्या ६६ डेल्टा प्लस रुग्णांपैकी ३२ पुरुष आणि ३४ महिला आहेत. बाधितांपैकी ३१ रुग्ण लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असल्याने रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता नसलेले होते. महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण जळगावमध्ये आढळून आलेत. येथे डेल्टा प्लसचे १३ रुग्ण आढळले असून त्या खालोखाल रत्नागिरी (१२), मुंबई (११), ठाणे (६), पुणे (६) तसेच चंद्रपूर, अकोला, सिंधुदूर्ग, सांगली, नंदूरबार, औरंगाबाद, कोल्हापूर, बीडमध्येही रुग्ण आढळून आलेत. गोंदिया, नांदेड, रायगडमध्ये प्रत्येकी दोन तर पालघरमध्ये तीन रुग्ण आढळून आलेत.

अधिक वाचा  Ramlala idol made from Krishna stone: कृष्ण शिलेपासून बनविलेल्या रामललाच्या मूर्तीचे ही आहेत खास वैशिष्ठ्ये

रुग्णांमध्ये दहा जणांच्या लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण झाल्या आहेत, तर आठ जणांनी केवळ एक मात्रा घेतलेली आहे, असे १८ जणांचे लसीकरण झाले आहे. यांपैकी दोन जणांनी कोव्हॅक्सिन तर उर्वरित जणांनी कोविशिल्ड लस घेतली आहे.

डेल्टा प्लस या करोनाच्या उत्परिवर्तित प्रकारामुळे मुंबईत ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेने लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्या होत्या आणि तिला फुप्फुसाचा आजार होता. डेल्टा प्लसबाधित व्यक्तीचा मुंबईतील हा पहिलाच मृत्यू आहे. डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून महिना उलटला तरी रुग्णसंख्या वेगाने वाढलेली नाही. त्यामुळे डेल्टाच्या तुलनेत संसर्ग प्रसाराची क्षमता कमी असल्याचे आढळले असले तरी घातकता मात्र अधिक असण्याची शक्यता आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love