पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११९ व्या पदवी प्रमाणपत्रासाठी आजपासून (दि. 30 जून ) विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२० मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे.
विद्यापीठाकडून हा पदवी प्रदान समारंभ ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये होणे अपेक्षित आहे. त्यासाठी विद्यर्थ्यांनी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्जाचा नमुना, शुल्क आदीबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या convocation.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी यासाठी १ जुलै ते ३१ जुलै २०२१ यादरम्यान नियमित शुल्कासह अर्ज करायचा आहे तर १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२१ दरम्यान विलंब शुल्कासह अर्ज करण्यात येईल.
पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज योग्य शुल्कासह भरल्यानंतर अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक असल्याचे विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे.