दीप्ती काळे यांची आत्महत्या नव्हे तर बाथरूम मधून पळून जाण्याच्या प्रयत्नात आठव्या मजल्यावरून पडून मृत्यू?


पुणे-पुणे शहरातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक बळवंत मराठे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आलेल्या अ‍ॅड. दीप्ती काळे यांनी ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचं मंगळवारी सांगितलं जात होतं.  मात्र, याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दीप्ती काळे यांनी आत्महत्या नव्हे तर ससून रुग्णालयाच्या बाथरूममधून पळून जाण्याचा प्रयत्न करताना आठव्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे 42 वर्षीय दीप्ती काळेने ससून रुग्णालयाच्या इमारतीतून उडी घेत आत्महत्या केली, असं वृत्त आधी समोर आलं होतं. परंतु पळून जाताना पडल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

अधिक वाचा  मेट्रो प्रकल्प कारशेड गोळीबार प्रकरण : नक्की गुढ काय?

सराफ व्यावसायिक बळवंत मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दीप्ती काळे आणि निलेश शेलार यांना पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाला धमकावल्या प्रकरणी आणखी एक तक्रार तिच्याविरोधात दाखल झाली. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाई केलेल्या टोळीची दीप्ती काळे ही प्रमुख होती. त्यामुळे पुणे पोलिसांनी तिच्यावर कालच मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे दीप्तीला ससून रुग्णालयातील कोव्हिड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना आंघोळीला जात असल्याचे कारण सांगून ती बाथरुममध्ये गेली. त्यानंतर खिडकीच्या काचा सरकवून पाईपवरुन उतरण्याचा तिने प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र पसार होण्याच्या प्रयत्नात तिचा पाय निसटला आणि ती थेट आठव्या मजल्यावरील डक्टमधून खाली पडल्याची माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा  संजय राऊत,आधी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करा- चंद्रकांत पाटील

बराच वेळ होऊनही बाहेर न आल्यामुळे पोलिसांनी बाथरुमचा दरवाजा ठोठावून पाहिला. कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने दार उघडून पाहिले असता काचा सरकवल्याचे पोलिसांना दिसले. त्यानंतर परिसराची पाहणी केली असता दीप्ती खाली गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे आढळले. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी दीप्तीला मृत घोषित केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love