टीईटी घोटाळा : सायबर पोलिसांनी केली ७९००बनावट शिक्षकांची यादी तयार : लवकरच कारवाई होणार

महाराष्ट्र शिक्षण
Spread the love

पुणे-शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात लाखों रुपये घेऊन तब्बल ७ हजार ९०० जणांना पात्र झाल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे पुणे सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या ७ हजार ९०० जणांची यादी पुणे सायबर पोलिसांनी पत्यासह तयार करण्यात आली असून बनावट शिक्षकांची तयार केलेली यादी पडताळणीसाठी शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आली आहे. शिक्षण विभागाने खातरजमा केल्यानंतर कारवाईला सुरुवात केली जाणार आहे. दरम्यान, या गैरव्यवहातील आरोपी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी गणेशन हा मंगळवारी पुणे पोलिसांपुढे हजर झाला.

टीईटी घोटाळा प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. टीईटी परीक्षेत तब्बल ७९००  अपात्र उमेदवारांनी पैसे देऊन पात्रता मिळविली आहे. या उमेदवारांना ओएमआर शीट मध्ये २८ मार्क असताना चक्क अंतिम निकालात ८२ मार्क दिल्याचे उघडकीस आले आहे. तसेच या उमेदवारांना पात्र करण्यासाठी परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडविताना कोडवर्ड देण्यात आला होता. विशेष म्हणजे एजंटला पैसे देणाऱ्याचं उमेदवारांनी उत्तरपत्रिकेवर काहीच प्रश्नांची उत्तरे सोडवायची ठरले होते. अश्या अनेक धक्कादायक बाबी सायबर पोलिसांनी उघडकीस आणल्या आहेत.

दरम्यान, शिक्षण विभागाने घेतल्या टीईटीची परीक्षा न देता दीडशे ते दोनशे जणांना परीक्षा पास असल्याचे दिलेली प्रमाणपत्र पोलिसांनी सील केली आहेत. यामुळे शिक्षण विभागातील आणखी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी या तपासातील अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच काही आरोपींना कोरोना संसर्ग झाल्याने त्यांच्याकडे तपास करण्याचे काम थंडावले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सायबर पोलिसांनी या तपासाला पुन्हा गती दिली आहे.

आरोपी गणेशन स्वतःहून हजर

जी. ए. सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशन हा पोलीस आयुक्त कार्यालयात स्वत: हून हजर झाला. त्याने आपल्याला बंगलोर न्यायालयाने आपले म्हणणे मांडता यावे, यासाठी तात्पुरता अटकपूर्व जामीन दिला असल्याची कागदपत्रे दाखविली आहेत. गणेशन याला यापूर्वी आम्ही चौकशीसाठी हजर झाल्याची नोटीस ई-मेलमार्फत दिली होती. मात्र, त्याने तेव्हा काहीही कळविले नव्हते. गणेशन आज पोलिसासमोर हजर झाले. आपल्याला अटक होईल या भीतीने गणेशन याने बंगलोर न्यायालयात धाव घेतली. आपला या प्रकरणात काही संबंध नाही. आपले म्हणणे पोलिसांसमोर मांडण्याची संधी मिळावी, आपण पोलीस तपासाला सहकार्य करायला तयार आहोत, असे सांगून त्यासाठी पुण्याला जाऊन म्हणणे मांडण्यासाठी अटकपासून संरक्षण देण्याची विनंती केली. त्यानुसार न्यायालयाने त्यांना 25 फेब्रुवारीपर्यंत कठोर कारवाई करु नये असे आदेश दिले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली आहे.

पुणे-शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात लाखों रुपये घेऊन तब्बल ७ हजार ९०० जणांना पात्र झाल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे पुणे सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या ७ हाजार ९०० जणांची यादी पुणे सायबर पोलिसांनी पत्यासह तयार करण्यात आली असून बनावट शिक्षकांची तयार केलेली यादी पडताळणीसाठी शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आली आहे. शिक्षण विभागाने खातरजमा केल्यानंतर कारवाईला सुरुवात केली जाणार आहे. दरम्यान, या गैरव्यवहातील आरोपी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी गणेशन हा मंगळवारी पुणे पोलिसांपुढे हजर झाला.

टीईटी घोटाळा प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. टीईटी परीक्षेत तब्बल ७९००  अपात्र उमेदवारांनी पैसे देऊन पात्रता मिळविली आहे. या उमेदवारांना ओएमआर शीट मध्ये २८ मार्क असताना चक्क अंतिम निकालात ८२ मार्क दिल्याचे उघडकीस आले आहे. तसेच या उमेदवारांना पात्र करण्यासाठी परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडविताना कोडवर्ड देण्यात आला होता. विशेष म्हणजे एजंटला पैसे देणाऱ्याचं उमेदवारांनी उत्तरपत्रिकेवर काहीच प्रश्नांची उत्तरे सोडवायची ठरले होते. अश्या अनेक धक्कादायक बाबी सायबर पोलिसांनी उघडकीस आणल्या आहेत.

दरम्यान, शिक्षण विभागाने घेतल्या टीईटीची परीक्षा न देता दीडशे ते दोनशे जणांना परीक्षा पास असल्याचे दिलेली प्रमाणपत्र पोलिसांनी सील केली आहेत. यामुळे शिक्षण विभागातील आणखी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी या तपासातील अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच काही आरोपींना कोरोना संसर्ग झाल्याने त्यांच्याकडे तपास करण्याचे काम थंडावले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सायबर पोलिसांनी या तपासाला पुन्हा गती दिली आहे.

आरोपी गणेशन स्वतःहून हजर

जी. ए. सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशन हा पोलीस आयुक्त कार्यालयात स्वत: हून हजर झाला. त्याने आपल्याला बंगलोर न्यायालयाने आपले म्हणणे मांडता यावे, यासाठी तात्पुरता अटकपूर्व जामीन दिला असल्याची कागदपत्रे दाखविली आहेत. गणेशन याला यापूर्वी आम्ही चौकशीसाठी हजर झाल्याची नोटीस ई-मेलमार्फत दिली होती. मात्र, त्याने तेव्हा काहीही कळविले नव्हते. गणेशन आज पोलिसासमोर हजर झाले. आपल्याला अटक होईल या भीतीने गणेशन याने बंगलोर न्यायालयात धाव घेतली. आपला या प्रकरणात काही संबंध नाही. आपले म्हणणे पोलिसांसमोर मांडण्याची संधी मिळावी, आपण पोलीस तपासाला सहकार्य करायला तयार आहोत, असे सांगून त्यासाठी पुण्याला जाऊन म्हणणे मांडण्यासाठी अटकपासून संरक्षण देण्याची विनंती केली. त्यानुसार न्यायालयाने त्यांना 25 फेब्रुवारीपर्यंत कठोर कारवाई करु नये असे आदेश दिले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *