ग्लेनमार्क तर्फे कोरोनाग्रस्त प्रौढ रूग्णांच्या उपचारांसाठी नायट्रिक ऑक्साइड नीझल स्प्रे लॉन्च

आंतरराष्ट्रीय आरोग्य
Spread the love

पुणे- कोरोना ग्रस्त प्रौढ रूग्णांच्या उपचारांसाठी जागतिक आणि नावीन्यपूर्ण औषध कंपनी असलेल्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड आणि कॅनेडियन फार्मास्युटिकल कंपनी सॅनोटीझ रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने आज भारतात फॅबीस्प्रे हा नायट्रिक ऑक्साइड नीझल स्प्रे लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्वरीत मंजूरी प्रक्रियेचा भाग म्हणून ग्लेनमार्कला या स्प्रेसाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांच्याकडून उत्पादन आणि विपणनाची मंजूरीदेखील मिळाली आहे. हवेतील कोरोनाचे विषाणू नष्ट करण्यासाठी नायट्रिक ऑक्साईड नीझल स्प्रे तयार करण्यात आला आहे. त्यात सार्स – कोव्ही -२ वर थेट विषाणूनाशक प्रभावासह अँटी-मायक्रोबियल गुणधर्म सिद्ध झाले आहेत.

हा स्प्रे विषाणूच्या विरूद्ध भौतिक आणि रासायनिक अडथळा म्हणून कार्य करते. त्यामुळे फुफ्फुसांमध्ये जाण्यापासून रोखते आणि  त्याचा प्रसार थांबवते. मार्च २०२१ मध्ये सॅनोटीझने केलेल्या   क्लिनिकल चाचण्यांच्या आधारे  हे स्प्रे   सार्स कोव्ही- २ च्या  सुरक्षित आणि प्रभावी अँटीव्हायरल उपचार असल्याचे दाखवले. पहिल्या २४ तासांत स्प्रे ने सरासरी व्हायरल लोड सुमारे ९५ टक्के आणि नंतर ७२ तासांच्या आत ९९ टक्के  पेक्षा जास्त कमी केला जातो .सॅनोटीझची जागतिक फेज ३ प्रतिबंध चाचणी चालू आहे. जी त्याच्या कार्यक्षमतेत आणखी भर घालेल. यूएसएमधील युटा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, स्प्रेने अल्फा, बीटा, गामा, डेल्टा आणि एप्सिलॉन व्हेरियंटसह सार्स कोव्हीड  -२ व्हायरसपैकी ९९.९ टक्के विषाणू २ मिनिटांत मारले असल्याचे सिद्ध झाले आहे.

भारतातील २० क्लिनिकल साइटवर प्रौढ कोरोना रूग्णांवर फेज तीनची क्लिनिकल चाचणी घेण्यात आली. ३०६ रूग्णांमध्ये केलेल्या दुहेरी-अंध, समांतर आर्म,  मल्टीसेंटर अभ्यासात  रूग्णालयात दाखल नसलेल्या प्रौढ रूग्णांमध्ये नायट्रिक ऑक्साईड नोझल स्प्रे विरुद्ध सामान्य सलाईन नोझल स्प्रेची परिणामकारकता आणि सुरक्षिततेचे मूल्यांकन केले गेले. अभ्यासात सर्व रुग्णांची योग्य ती काळजी घेण्यात आली . लसीकरण न केलेले रूग्ण, मध्यम आणि वृद्ध वयोगटातील रूग्ण आणि सह-विकृती असलेले रूग्ण अशा चाचणीने रोगाच्या प्रगतीचा धोका असलेल्या रूग्णांचे विश्लेषण केले.

या स्प्रेबाबत ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे मुख्य व्यावसायिक अधिकारी रॉबर्ट क्रॉकार्ट म्हणाले  की  भारताचा कोरोना विरुद्ध सुरू असलेल्या लढ्याचा आम्ही एक आघाडीची फार्मास्युटिकल कंपनी म्हणून अविभाज्य भाग आहोत. नायट्रिक ऑक्साइड नीझल स्प्रेसाठी नियामक मंजूरी मिळाल्याबद्दल आणि सॅनोटीझ सह भागीदारीत ते लॉन्च करण्यात आम्हाला आनंद होत आहे. हा स्प्रे कोविड – १९ साठी आणखी एक सुरक्षित आणि प्रभावी अँटीव्हायरल उपचार प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करते. आम्हाला खात्री आहे की ते रुग्णांना अत्यंत आवश्यक आणि वेळेवर उपचार पर्याय देईल.

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे क्लिनिकल डेव्हलपमेंट विभागाच्या वरीष्ठ उपाध्यक्षा आणि प्रमुख डॉ. मोनिका टंडन म्हणाल्या की या फेज तीनमध्य  दुहेरी अंध, प्लेसबो नियंत्रित चाचणीचे परिणाम उत्साहवर्धक आहेत. विषाणूजन्य भार कमी करण्याच्या प्रात्यक्षिकाचा रुग्ण आणि समुदायाच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण सकारात्मक प्रभाव पडतो. सध्याच्या परिस्थितीत, नवीन उदयोन्मुख रूपे उच्च संप्रेषणक्षमतेचे प्रदर्शन करत आहेत. त्यामुळे हा स्प्रे भारताच्या कोविड-१९ विरुद्धच्या लढ्यात एक उपयुक्त पर्याय असेल.

अभ्यासाच्या प्रमुख अन्वेषकांपैकी एक डॉ. श्रीकांत कृष्णमूर्ती यांनी याबाबत म्हणाले  की मला अभ्यासाचे परिणाम पाहण्याची संधी मिळाली आहे. नायट्रिक ऑक्साइड नोझल स्प्रे विषाणूचा भार कमी करतो आणि कोविड १९ संसर्गामध्ये लवकर वापरल्यास आरटीपीसीआर नकारात्मकता वाढवते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्प्रेसह व्हायरल लोड कमी होण्यामध्ये ट्रान्समिशनची साखळी कमी करण्याची क्षमता आहे. हा स्प्रे सामयिक असल्याने सुरक्षित आहे आणि हा उपचारात्मक पर्याय अतिशय आकर्षक बनवतो”.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *