पंतप्रधान मोदी यांची आक्षेपार्ह पोस्ट :राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रदेश सचिवांवर गुन्हा दाखल


पुणे- पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे  महाराष्ट्र सचिव मोहसीन शेख तसेच शिवाजीराव जाविर ह्याच्या विरुद्ध पुणे शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

विनीत वाजपेयी पुणे शहर भाजपा सोशल मीडिया संयोजक, श्री रुपेश पवार- वडगांव शेरी मतदारसंघ संयोजक भाजपा सोशल मीडिया व गौरव शेट्टी ह्यांनी ही तक्रार नोंदवली आहे.

मोहसीन शेख तसेच शिवाजीराव जाविर यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधानांचे  मॉर्फ केलेले फोटो वापरुन देशाच्या पंतप्रधान पदाचा अपमान केला असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.

दरम्यान,अशा प्रकारच्या बदनामी करणाऱ्या लोकांना अत्यंत कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी भाजपचे पुणे शहर प्रवक्ते विकास लवटे यांनी केली आहे. तसेच अशा पोस्ट ह्यापुढे कोणत्याही प्रकारे खपवून घेतल्या जाणार नाहीत असं इशारा त्यांनी दिला..

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  अमेरिकन भारतीयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही सर्वाधिक लोकप्रिय