The DNA of conspiracies is BJP's

‘भ्रष्टाचाऱ्यांना थारा नको’ हे फडणवीसांनी सांगावे का..? – गोपाळदादा तिवारी

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे – “सुरत-गुहावटी-राज्यपाल” मार्गे राज्याच्या न्यायप्रविष्ट – सत्तेवर आलेले ऊपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातील शैक्षणीक संस्थेच्या कार्यक्रमात बोलतांना, “भ्रष्टाचार व भ्रष्टाचारी यांना थारा नको(?)”  असे विधान केले. मात्र, त्यांचे हे विधान त्यांची ऊक्ती व कृती पाहता विसंगत व आश्चर्यकारक असल्याची टिका काँग्रेसचे राज्यप्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे की, गेले काही वर्षांचे भाजपचे विविध राज्यातील राजकारण पाहता व महाराष्ट्रासह राज्यातील इतर पक्षीय नेत्यांवर ईडीने कारवाया सुरू करताच, त्यांनी भाजपची वाट धरल्यावर मात्र त्यांच्या चौकशा बंद होऊन भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप मागे घेतले जात असल्याचे स्पष्ट होत असतांना फडणवीस कशाचे आधारे भ्रष्टाचारा संबंधी बोलतात? तसेच ‘आप’चे नेते सिसोदीया यांना तर भाजप’त आल्यास कारवाई करणार नाही(?) असे संदेश जिथे भाजप कडून जात आहेत, राज्यातील भ्रष्टाचाराच्या चौकशा सुरू होऊन, कारवाई करण्याच्या आतच त्यांच्या चौकशा बंद करून ज्यांनी त्यांचे सोबत सत्ता-संगत केली, अशा परिस्थितीत फडणवीसांनी भ्रष्टाचारावर बोलणे निव्वळ तकलादू पणाचे, अविश्वासर्ह व हास्यास्पद आहे..!

त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांना थारा नको’ हे फडणवीसांनी सांगूच नये. जलयुक्त शिवार चौकशी बंद करणे, भाजपवासी नेत्यांच्या ईडी चौकशा बंद करणे व फोन टॅपिंग चौकशी केंद्रीय यंत्रणेकडे देणे’ हे कशाचे समर्थन आहे (?) हे पारदर्शकतेचे का भ्रष्टाचार पाठीशी घालण्याचे समर्थन आहे असा सवाल काँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *