पुणे – ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यातील कार्तिकी भागवत एकादशी आळंदीत कोरोंना महामारीचे सावटात मोजक्याच भाविकांच्या नाम जयघोषात शुक्रवारी (दि.११) साजरी झाली. आळंदी यात्रेतील कार्तिकी एकादशी सोहळा शेकडो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत हरिनाम गजरात झाला.
आळंदी यात्रेत संचारबंदी लागू असल्याने मोजक्याच वारकरी भाविकांनी नदी घाटावर स्नान करण्यास भल्या पहाटे हजेरी लावली. रस्त्यावर तुरळक दिसत असलेल्या भाविकांनी आळंदीतील नदी घाटावर दर्शन आणि माऊली पालखीची नगरप्रदक्षिणेस मात्र मोठी गर्दी केली. माऊलीचे पादुका पालखीचे नगरप्रदक्षिणेने दरम्यान भाविकांनी दर्शन घेतले.
उद्या शनिवारी (दि.१२) आळंदीत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथोत्सवासाठी मंदिरातून गोपाळपुर येथे माऊलीची पालखी खांद्यावर येईल . त्यानंतर गोपाळपुरा येथून रथोत्सवास सुरुवात होणार आहे. मंदिरात एकादशी प्रथापरंपरांचे पालन करीत साजरी झाली. पंढरपूर येथून संत नामदेव, श्री पांडुरंग, श्री पुंडलिकराय यांचे पादुका पालखी सोहळे शासकीय बसने हरिनाम गजरात आळंदीत दाखल झाले.
कार्तिकी एकादशीला पवमान पूजेसाठी प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक,विश्वस्त अॅड.विकास ढगे, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख,खासदार संजय जाधव,उपायुक्त मंचाक इप्पर, प्रांत विक्रांत चव्हाण,मंडलधिकारी चेतन चासकर, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचेसह मोजकेच भाविक उपस्थित होते.
शुक्रवारी (दि.११) पहाटे च्या पूजेसाठी रात्री १२ चे सुमारास मंदिरातील नित्यनैमित्तिक
गुरुवारची पालखी मंदिर प्रदक्षिणा हरिनाम गजरात तसेच वाल्हेकर यांचे तर्फे हरिजागर झाला. दरम्यान पहाट पूजेचे तयारीने मंदिरात वेग घेतला. मंदिरात स्वच्छतेची सेवा झाली. दरम्यान घंटानाद झाला. यावर्षी कोरोंनाचे संकट या कार्तिकी यात्रेवर असल्याने आळंदीत भाविकांची गर्दी नसल्याने मोजक्याच भाविक,मानकरी,वारकरी ,पदाधिकारी यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. पहाटे घंटानाद झाल्यानंतर २ च्या सुमारास पवमान अभिषेक व ११ ब्रम्ह्वृंदांचे उपस्थितीत वेदमंत्र जयघोष प्रसाद जोशी यांचे पौरोहित्यात झाला. परंपरेने भीमा वाघमारे यांचे नियंत्रणात मंदिरात सनई चौघड्याच्या मंजुळ स्वराने भक्तिमय वातावरण निर्मिती केली . मंदिरात पहाट पूजे दरम्यान आकर्षक फुलांची सजावट राजाराम भूजबळ , मुकुंद कुलकर्णी यांनी तर लक्षवेधी विद्युत रोषणाई सेवा सामाजिक कार्यकर्ते संतोष वाळके यांनी रुजू केली. विना मंडपा समोर लक्षवेधी रंगावली राजश्री जुन्नरकर यांनी काढली. विद्युत रोषणाई , रंगोली आणि लक्षवेधी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आल्याने मंदिराचे वैभव वाढले.
संत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा लावून पंचामृत अभिषेक पूजा ११ ब्रम्ह्वृंदांच्या वेद मंत्र जयघोषात पूजा बांधली . माऊलींचे रूप आकर्षक सजल्याने पहावेसे वाटत राहिले. यावेळी पूजेत दूध, दही, तूप, मध, साखर, आम्रखंड, सुगंधी तेल, उटणे, अत्तर आदींचा वापर झाला. लक्षवेधी मेखला, शाल, तुळशीचा हार,सोनेरी मुकुट समाधीला आकर्षक लाभला. पुजारी प्रसाद जोशी यांनी मंत्रपठन केले. माऊलींच्या आरती नंतर मानकरी, सेवेकऱ्यांना आणि मान्यवरांना प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक,विश्वस्त विकास धागे पाटील यांचे हस्ते नारळ प्रसाद झाला. यावर्षी दर्शनबारी बंद असल्याने मानाचे वारकरी सन्मान देण्यात आला नाही.
माऊलींचे आरती नंतर समाधी दर्शनासाठी कारंजे मंडपातून पासधारकांना सोडण्यात आले. माउली मंदिरात दुपारी फराळचा महानैवेद्य झाला. त्यानंतर पालखी नगरप्रदक्षीनेस दुपारी महाद्वारातून बाहेर निघाली. मंदिरातून नगर प्रदक्षिणेला नाम गजरात प्रदक्षियन मार्गे,हजेरी मारुती मंदिरात आरती, अभंग, हरिनाम गाजर व प्रमुख मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला. भाविक, वारकरी यांनी हरिनामाचा जयघोष करीत प्रदक्षिणा मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती. हजेरी मारुती मंदिरात परंपरेचे अभंग गायन, कीर्तन झाले. मंदिरात प्रदक्षिणा झाल्यानंतर धूपारती झाली. रात्री हरिजागर झाला. मंदिरात सुरक्षेच्या साठी विशेष दक्षता घेण्यात आल्याचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक व विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी सांगितले.
आळंदीत कार्तिकी एकादशी व माऊलींचा संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपूर येथून श्री पांडुरंगराय, श्री पुंडलिकराय व संत नामदेवराय यांचे वैभवी पादुका यावर्षी शासकीय आदेशांचे पालन करीत आळंदीत बसने प्रवेशल्या.या पादुकांसंवेत मोजकेच वारकरी यांना आळंदीत सोहळ्या समवेत प्रवेश देण्यात आला. तत्पूर्वी थोरल्या पादुका येथे विधीतज्ञ विष्णु तापकिर यांनी सोहळ्याचे स्वागत केले. आळंदीत या वेळी पादुका पालखी सोहळ्याचे आगमन व स्वागत करण्यात आले.