#दिलासादायक:पुण्यात सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णसंख्या, कोरोनामुक्त रुग्णसंख्येपेक्षा कमी

आरोग्य पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- वाढत्या कोरोनाच्या संकटाने भेदरलेल्या पुणेकरांसाठी एक दिलसादायक बातमी आहे. पुणे मनपा हद्दीत सलग चौथ्या दिवशी नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णसंख्या , कोरोनामुक्त रुग्णसंख्येपेक्षा कमी नोंदवली गेली आहे. आज ४,५३९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर तर ४,८५१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले.

पुणे शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. काही दिवसांपूर्वी शहरात दिवसाला सहा हजरांपेक्षा जास्त नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत होती. राज्य सरकारने संचारबंदी, विकेंड लॉकडाऊन, कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित त्याचा परिणाम म्हणूनही ही संख्या आटोक्यात आल्याचे दिसते आहे.  

दरम्यान, आज दिवसभरात पुण्यात ८० करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला त्यामधील २४ रूग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. सध्या विविध रुग्णालयांमध्ये १३१३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू असून पुण्यातील एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३८७०३० इतकी झाली आहे तर  ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ५१५५२ इतकी आहे. आजपर्यन्त पुणे शहरात कोरोनाने ६३३० एकूण मृत्यू झाले आहेत. तर आजपर्यंतचे ३२९१४८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात २२२७७ नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *