ही वेळ मोर्चे काढायची नाही- छत्रपती संभाजीराजे यांचे मराठा नेत्यांना आवाहन

पुणे – आपण जगलो तरच पुढे मराठा आरक्षणासाठी लढणार आहोत. त्यामुळे समाजात उद्रेक निर्माण होईल अशी कोणतीही गोष्ट कोणी करू नये. ज्या उद्रेकच्या माध्यमातून सामान्य माणसाला त्याचा त्रास होईल,असे कोणतेही पाऊल उचलू नये, असे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे. ही वेळ मोर्चे काढायची नाही तर ही वेळ सामान्य माणसे जगवण्याची वेळ आहे, असेही […]

Read More

#दिलासादायक:पुण्यात सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णसंख्या, कोरोनामुक्त रुग्णसंख्येपेक्षा कमी

पुणे- वाढत्या कोरोनाच्या संकटाने भेदरलेल्या पुणेकरांसाठी एक दिलसादायक बातमी आहे. पुणे मनपा हद्दीत सलग चौथ्या दिवशी नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णसंख्या , कोरोनामुक्त रुग्णसंख्येपेक्षा कमी नोंदवली गेली आहे. आज ४,५३९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर तर ४,८५१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. पुणे शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. काही दिवसांपूर्वी शहरात दिवसाला सहा […]

Read More

“कोरोनाग्रस्त पेशंटच्या बेडवरती रेमडेसिवीर इंजेक्शन देणार होतात,कुठे आहेत? “पालकमंत्री साहेब पुणेकरांना वाचवा”- पुण्यात लागले फ्लेक्स

पुणे- पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाने कहर केला आहे. एकीकडे बेडची कमतरता असल्याने ससून रुग्णालयात एका बेडवर दोन ते तीन रुग्ण उपचार घेत आहेत, तर काहींना बेड न मिळाल्याने त्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ज्यांना बेड मिळाले त्यांना ऑक्सीजन नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन नाही, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईक वणवण भटकत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु आहे. […]

Read More

ससूनमधील निवासी डॉक्टरांचा संपावर जाण्याचा इशारा

पुणे—पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. त्यात बाहेरच्या शहरातूनही कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी पुण्यामध्ये येत आहेत. त्याचा ताण येथील आरोग्य व्यवस्थेवर पडत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ससून रुग्णालयात खाटा वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र याला ससूनमधील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने विरोध दर्शवला आहे. प्रशासनाने खाटांची संख्या वाढविण्याबरोबरच पुरेसे मनुष्यबळ, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, […]

Read More