ग्राहक आयोगाचा टाटा टेलि सर्विसेसला दणका : दीड लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश


पुणे—‘डू नॉट डिस्टर्ब’ सुरू असताना आणि वारंवार तक्रार करूनही सातत्याने नको असलेले फोन येऊन ग्राहकाला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसानीपोटी दीड लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश ग्राहक आयोगाने टाटा टेलि सर्विसेस लिमिटेडला दिले आहेत.

आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्य क्षितीजा कुलकर्णी आणि संगीता यादव देशमुख यांनी हा निकाल दिला.अॅड. सिद्धार्थशंकर अमर शर्मा यांनी याबाबत आयोगाकडे टाटा टेलि सर्विसेस लिमिटेडच्या नवी दिल्ली आणि बंडगार्डन रस्त्यावरील कार्यालयाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. शर्मा २०२१ ते २०१६ दरम्यान टाटा डोकोमोचे सीम वापरत होते. कंपनीचे प्रीपेड सिम कार्ड सक्रिय करताना त्यांनी ‘डू नॉट डिस्टर्ब’ च्या सुविधेसाठी नोंदणी केली होती. मात्र तरीही टेलिमार्केटिंगचे नको असलेले कॉल्स त्यांना सुरू झाले. त्यांना सातत्याने आग्रह करून प्रिपेड सिमकार्ड पोस्टपेडमध्ये बदलण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतरही नको असलेले फोन सातत्याने सुरूच राहिल्यामळे ते रेकॉर्ड करून शर्मा यांनी त्याची माहिती कंपनीला दिली होती. त्यानंतर कंपनीने त्याच्या तक्रारीची दखल घेऊन नको असलेले टेलिमार्केटिंगचे कॉल्स तात्पुरते थांबविले. पण पुन्हा कंपनीच्या एजंटच्या खासगी मोबाईल क्रमांकावरून त्यांना कॉल्स सुरू झाले. मोबाईलवर मिस कॉल्स पडल्यानंतर त्या कॉल्सवर फोन केला असता त्यांना कॉल शुल्क आकारण्यात आले. त्यामुळे कंपनीने ट्रायच्या नियमांचा भंग केले. त्यानंतर तक्रारदाराने टेलिमार्केटिंग सुविधांबाबत चुकीचे मतप्रदर्शन केल्यामुळे कंपनीने त्यांचे सिमकार्ड निष्क्रीय केले, असे अॅड. शर्मा यांनी केलेल्या तक्रारीत नमूद आहे. या सर्व प्रकारामुळे मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसानीपोटी तक्रारदाराने आयोगाकडे धाव घेतली. तक्रारदाराने सादर केलेल्या पुराव्यानुसार आयोगाने कंपनीला नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

अधिक वाचा  धिरोदत्त व समर्पित व्यक्तित्व : श्री अशोकराव सराफ

तक्रार खर्चाचे मिळणार ३० हजार रुपये शारीरिक व मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसानीपोटी दीड लाख रुपये नुकसानभरपाईसह तक्रारदाराला तकारीच्या खर्चापोटी 30  हजार रुपये द्यावेत नुकसान भरपाईच्या एकूण रकमेवर प्रत्येक वर्षी नऊ टक्के व्याजदराप्रमाणे होणारी रक्कम निकालापासून सहा आठवड्याच्या आत, द्यावी असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love