पुणे- पुणे महानगरपालिकेच्या ज्या पायऱ्यांवर गेल्या शनिवारी किरीट सोमय्यांना धक्काबुक्की झाली होती त्याच पायऱ्यांवर सर्व विरोध झुगारून भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांचा सत्कार केला. मात्र, आता काँग्रेसने त्या पायऱ्यावर गोमूत्र आणि गुलाबपाणी टाकून भाजपच्या स्टंबाजीचा निषेध केला आहे.
किरीट सोमय्या यांच्या येण्यामुळे याठिकाणी मोठा राडा झाला. पुणेकरांच्या प्रश्नासाठी किरीट सोमय्या कधी आले नाहीत, मात्र आता फक्त कंगावा करायला सोमय्या इथे येत आहेत. त्यामुळे त्यांचा निषेध आहे. अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांच्याविरोधात काँग्रेसकडून देण्यात आली. तसेच आम आदमी पार्टीनेही पुण्यात महापालिकेसमोर आंदोलन केलं . किरीट सोमय्या येणार होते म्हणून कुणालाही प्रवेश दिला नाही, गिरीश बापट दिडशे लोकं आत घेऊन घुसतात, हे निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया आम आदमी पार्टीकडून देण्यात आली आहे.
दोन पोलिस निलंबित
सोमय्यांना शिवसैनिकांकडून झालेल्या धक्काबुक्की प्रकरणात कामात हलगर्जीपणा केल्यामुळे दोघा पोलिसांचे निलंबन करण्यात आलं आहे. पुणे पोलीस दलातील पोलीस शिपाई दिलीप नारायण गोरे आणि सतीश ज्ञानदेव शिंदे या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आल आहे. दिलीप गोरे आणि सतीश शिंदे पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्थानकात गोपनीय विभागात कार्यरत आहेत.