वंचित आघाडी कडुन काँग्रेसकडे आघाडी बाबत स्पष्ट प्रस्ताव नव्हता- गोपाळदादा तिवारी

‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा

पुणे –राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका वा नगरपरिषदांमध्ये ‘काँग्रेस सोबत आघाडी साठी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी प्रियदर्शनी तेलंग व सरचिटणीस प्रफुल गुजर हे आपल्या ‘पुणे कार्यालयात’ भेटण्यास आले होते हे सत्य आहे. मात्र, त्याबाबतचा कुठलाही लेखी प्रस्ताव आलेला नसताना काही माध्यमांशी  बोलताना प्रकाशजी आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस प्रवक्त्यांकडे (अर्थात माझे कडे) युती – आघाडी बाबत प्रस्ताव दिला असल्याचे सांगितले. ही बाब वास्तवतेला धरून नसल्याचे कॉँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे.  

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका वा नगरपरिषदांमध्ये ‘काँग्रेस सोबत आघाडी साठी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी प्रियदर्शनी तेलंग व सरचिटणीस प्रफुल गुजर हे आपल्या ‘पुणे कार्यालयात’ भेटण्यास आले होते. त्यावेळी लोकशाही मुल्ये व संविधान वाचवणे बाबत मतांची विभागणी टाळणे विषयी सकारात्मक चर्चा देखील झाली. मात्र आपण त्यांना पक्षाध्यक्ष प्रकाशजी उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचे कडुन ‘वंचित बहुजन आघाडी पक्षाची मतें, बलस्थाने, स्ट्रेंथ व अपेक्षा’ या विषयी काही ‘धोरणात्मक स्पष्टता दर्शवणारा’ कोणताही लेखी प्रस्ताव आल्यास, आपण तो आमच्या पक्षाचे प्रदेशधयक्ष नाना पटोले व पक्षश्रेष्ठींसमोर मांडू व त्या दृष्टीने जेष्ठ नेत्यांची बैठकही आयोजित करू असे आपण सांगितले असल्याचा खुलासा काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला आहे. तसेच ही बाब प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देखील कळवली. मात्र, त्यानंतर कोणतेही पत्र वा लेखी प्रस्ताव ‘वंचित बहुजन आघाडी’ कडून आला नसल्याचे ही गोपाळदादा तिवारी यांनी स्पष्ट केले.  

अधिक वाचा  गैरसोयीच्या माणसाचा घोटाळा बाहेर काढायचा अन सोयीच्या माणसाचा झाकून ठेवायचा- राजू शेट्टी

मात्र काही माध्यमां समोर मुलाखतीत प्रकाशजी आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस प्रवक्त्यांकडे (अर्थात माझे कडे) युती – आघाडी बाबत प्रस्ताव दिला असल्याचे सांगितले. त्यामुळे ही बाब वास्तवतेला धरून नसल्याने, काँग्रेस विषयी गैरसमज नसावा याच हेतुने सदर खुलासा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस करीत असल्याचे प्रवक्ते गेपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे. जातीयवादी फॅसिस्ट शक्तींना रोखण्या करीतां, संविधान मुल्ये वाचवण्याकरीता व मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस सदैव सकारात्मक भुमिकेत आहे, मात्र कृतीने निर्णयात्मक ठोस पावले बहुजन वंचित पक्षाकडुन उचलली गेल्यासच, पुढे आघाडी बाबत बोलणी होऊ शकतात असेही त्यांनी नमुद केले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love