मिनि लॉकडाउनच्या नावाखाली संपूर्ण लॉकडाउन: कायदेभंग करण्याचा भाजपचा इशारा


पुणे-मिनि लॉकडाउनच्या नावाखाली महापालिका प्रशासनाने शहरात संपूर्ण लॉकडाउन केला असून, त्यामुळे पुणेकरांचे जीवनमान ठप्प होणार असून, शहराची अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर शहरांमध्ये एक नियम आणि पुण्यात वेगळा नियम हे अन्यायकारक आहे. पुण्यात लादलेले नियम तातडीने शिथिल करावेत आणि राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी जारी केलेली नियमावली लावावी अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि खासदार गिरीश बापट यांनी केली अन्यथा रस्त्यावर उतरून कायदेभंग करू असा इशारा दिला.

मुळीक म्हणाले, ‘शहरातील सर्व प्रकाराची दुकाने यापूर्वी सायंकाळी सहावाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र, सुधारित आदेशात अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने वळता सर्व प्रकाराची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरातील छोटे व्यावसायिक आणि त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या कर्मचार्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. हातावर पोट असणार्‍या सर्वसामान्य नागरिकांना रोजचा उदरनिर्वाह अवघड होणार आहे.’

अधिक वाचा  पुणे व्यापारी महासंघाचा संपूर्ण लॉकडाऊनला पाठिंबा , पण ...

खासदार बापट म्हणाले, ‘विमान, रेल्वे, एसटी यांच्यासह संपूर्ण राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालू राहाणार आहे. मात्र पुणे शहराची जीवनवाहिनी असणारी पुणे महानगरप परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसगाड्या अत्यावश्यक सेवा वगळता ३० एप्रिलपर्यंत बंद केल्या आहेत. या बससेवेचा दररोज पाच लाख प्रवासी लाभ घेतात. केवळ पाच रुपयांत प्रवास करता येत असल्याने सर्वसामान्यांना परवडणारी ही सेवा आहे. परंतु ती बंद केल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत.’

शहरात कोरोनाबाधितांसाठी अधिकाधिक बेड उपलब्ध करून द्यावेत, ऑक्सिजनयुक्त आणि व्हेंटिलेटरचे बेडस उपलब्ध होत नाहीत, त्यांची मोठ्या प्रमाणात सं‘या वाढवावी, कोरोना चाचण्यांची सं‘या वाढवावी, लसीकरणाचा वेग वाढवावा, आवश्यकतेनुसार डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या कराव्यात. नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आवश्यक माहिती यंत्रणा विकसित करावी अशा मागण्या पक्षाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. या सर्वांसाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा अशीही मागणी करण्यात आली आहे.

अधिक वाचा  फडणवीसांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी : ब्राह्मण महासंघाची जेपी नड्डांकडे मागणी

शहरात रात्री आठनंतर संचारबंदी करावी, सर्व व्यावसायिकांना रात्री आठ पर्यंत व्यवसाय करण्याची मुभा द्यावी आणि रात्री आठपर्यंत पीएमपीची बससेवा पूर्ववत करावी अशा भारतीय जनता पार्टीच्या मागण्या आहेत. त्या तातडीने मान्य कराव्यात अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून कायदेभंग करावा लागेल असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

भाजपच्या वतीने लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी विशेष मोहिम

पुणे शहर भाजपच्या वतीने लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी आजपासून विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार स्थानिक स्तरावर लसीकरणासंदर्भात माहिती, मार्गदर्शन, जनजागृती, नोंदणी प्रकि‘या करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love