पुणे- विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मंतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष निवडणुका लढले असते तर चित्र वेगळं असते असं विधान निकालावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होतं. या त्यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना चिमटे काढले, विनोदी विधान करण्याचा चंद्रकांत पाटील यांचा लौकिक आहे, ते मागच्या वेळी विधान परिषदेला कसे निवडून आले हे त्यांना माहीत आहे, असा टोला त्यांनी लगावला.
मागीळवेळी आमचे एका पेक्षा जास्त उमेदवार होते त्यामुळे चंद्रकांत पाटील निवडून आले त्याचा अंदाज त्यांना होता. त्यामुळे विधानसभेच्या वेळी त्यांनी पुण्यातला त्यांच्या सोयीचा मतदारसंघ निवडला त्यांना जर विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ बदलला नसता. त्यामुळे त्यांनी एखादे स्टेटमेंट केले असेल तर त्याकडे गांभीर्याने पहायची गरज नाही असे पवार म्हणाले.
दरम्यान, धुळे नंदुरबार विधान परिषदेच्या निवडणुकीत अमरीश पटेल यांचा झालेला विजय हा भाजपचा खरा विजय नाही, ते यापूर्वी त्या जागेवर विजयी झाले होते,त्यांना मानणारा वर्ग त्यांच्या पाठीशी राहिला म्हणून त्यांचा विजय झाला असे पवार म्हणाले.