राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला महापुरूषांना सघोष मानवंदना व वाद्यपूजन करीत विजयादशमीचा उत्सव साजरा


पुणे- कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेले नियम लक्षात घेऊन यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे महानगरातर्फे महापुरूषांना सघोष मानवंदना व वाद्यपूजन करीत विजयादशमीचा उत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान यंदा पुणे महानगरात यंदा सघोष पथसंचलने काढण्यात आले नाहीत.

विजयादशमीच्या दिवशी सकाळी एकाच वेळेला संपूर्ण महानगरात निघणारी सघोष संचलने, संचलनाच्या मार्गावरून रांगोळ्यांची आरास, फुलांची उधळण करीत पथसंचलनांचे चौकाचौकात स्वागत असे संघाचे सघोष पथसंचलन पाहणे हा एक अविमस्मरणीय अनुभव असतो. मात्र यंदा कोरोनाच्या संसर्गाची अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेवून व प्रशासनाने लोकांनी एकत्र येण्यासंबंधाने घालून दिलेल्या नियम लक्षात घेऊन संपूर्ण महागनरात सघोष पथसंचलनाएैवजी महानगरातील चार उपनगरांमध्ये (कसबा, कोथरूड, येरवाडा, पवर्ती) महापुरूषांना सघोष मानवंदना देण्यात आली तर उर्वरित भागांमध्ये संख्या व इतर सर्व नियमांच्या आधीन राहून वाद्यपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अधिक वाचा  पुणे शहरातील सर्व शाळा ३ जानेवारीपर्यंत बंद - महापौर मुरलीधर मोहोळ

महानगरातील मुख्य कार्यक्रमातंर्गत शिवाजीनगर भागातील एसएसपीएमएस शाळेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सघोष मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी पुणे महानगराचे महापौर मुरलीधर मोहोळ, रा.स्व.संघ पुणे महानगराचे संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कार्यवाह महेश करपे, कसबा भाग संघचालक प्रशांत कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शंख व भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले. यावेळी वीस जणांच्या घोषाच्या पथकाने वादन केले व मानवंदना दिली. याच रितीने पर्वती भागात झालेल्या कार्यक्रमास उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

महानगरात उर्वरित ठिकाणी संघ कार्यालयांमध्ये प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांच्या आधीन राहून वाद्यपूजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दरम्यान, त्याआधी मागील आठवडाभरापासून संपूर्ण महानगरात विविध भागांतील शाखांतर्फे शस्त्रपूजन उत्सव व मान्यवरांच्या व्याख्यानाचे ऑनलाईन कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते. त्यास स्वयंसेवक, नागरिकांचा मोठा सहभाग लाभला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love