शिक्षणाविषयी ठाकरे सरकार उदासीन:अकरावी प्रवेश प्रक्रिया तत्काळ सुरु करण्याची अभाविपची मागणी


पुणे- अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालू नसल्याने अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत तसेच पालक वर्ग त्रस्त आहे. महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने देखील शिक्षण सुरू झालेले नसून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासन अनेक अभ्यासक्रमात कपात करत  असल्याने विद्यार्थी संभ्रमात आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया तत्काळ सुरु करावी अशी मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने (अभाविप) आज माध्यमिक शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. प्रत्येक शासन निर्णयाची अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून होणार का? असा सवाल करत, शिक्षणाविषयी ठाकरे सरकार उदासीन असल्याचा आरोप पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी यावेळी केला.

 आतापर्यंत प्रथम फेरीमध्ये २ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज दाखल केले आहेत ११७५२० अर्ज स्वीकारण्यात आले आहे व ५३३८३ प्रवेश निश्चित झाले आहे. परंतु प्रक्रिया खंडित केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे  प्रवेश घेणे बाकी आहे. शासन कोणताच निर्णय घेत नसल्या कारणाने ह्या सर्व विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आहे. आज देखील अभाविपने आंदोलन केले त्यावेळी मा. उपसंचालक कार्यालयात उपस्थित नव्हते त्यामुळे शिक्षण विभागाची अतिशय दयनीय अवस्था ह्या तिघाडी सरकारच्या काळात सुरू असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला.

अधिक वाचा  सतत प्रयत्न करणारे कधीच हरत नाहीत - अलार्ड विद्यापीठाचे कुलपति डॉ.एल.आर.यादव यांचे मत

परीक्षा घेण्यासंदर्भात देखील महाराष्ट्र सरकारने कोणताच निर्णय घेतला नव्हता शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार परीक्षा घ्याव्या लागल्या.  आज देखील तीच परिस्थिती आलेली आहे. प्रत्येक शासन निर्णयाची अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून होणार का? हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे अनेक राज्यांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया पार पडलेली आहे व त्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू झालेल आहे. सात महिने झालेत  तरीदेखील या विद्यार्थ्यांबाबत शासनाने निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे शिक्षणाविषयी ठाकरे सरकार किती उदासीन आहे हे लक्षात येते. असे मत यावेळी पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी व्यक्त केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love