संकटकाळात पुरग्रस्तांसाठी पुण्याच्या Beyond Mounatins ट्रेकर्स ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी


पुणे- कोल्हापूर,सांगली व सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे.वाई तालुक्यातील बलकवडे धरणाच्या बॅक वॉटर परिसरातील डोंगराळ भागात असलेले गोळेगाव हे छोटेसे गाव. महाबळेश्वरच्या डोंगरावर व परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे व दरड कोसळल्यामुळे गावातील कुटुंबाचे होत्याचे नव्हते झाले.येथील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. घरातील साहित्य पुरात वाहून गेल्यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक गावांचे पुराने वाहून गेल्यामुळे व जागोजागी झालेल्या भूस्खलनामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांना जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता असल्याची गरज ओळखून व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असलेल्या गोळेवाडी गावच्या परिसरात पुण्यातील  Beyond Mounatins  ट्रेकर्स ग्रुप तर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तू थेट गावात जाऊन वितरित करण्यात आल्या.

अधिक वाचा  स्वयं चार्जिंग ‘पाय-कार’ निर्मितीसाठी जर्मनीची मोठी गुंतवणूक

नागरिकांना थेट मदत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते त्यांनी बियोन्ड मोउंटेन्स ह्या पुण्यातील ट्रेकर्स ग्रुप च्या ह्या उपक्रमाबद्दल  गोळेवाडी येथील ग्रामस्थ भारावून गेले व त्यांनी ह्या ट्रेकर्स गृपचे मनापासून आभार मानले.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या पटांगणात हा मदत वाटप कार्यक्रम घेण्यात आला.

या उपक्रमास Beyond Mountains ह्या  पुण्यातील ट्रेकर्स ग्रुप पुणे चे समीर दिवेकर ह्यांनी पुढाकार घेऊन मदत केली.त्यांच्या टीम मध्ये अपर्णा दिवेकर,ओंकार उपाध्ये,श्रुती कुलकर्णी,अमेय आपटे,वरद हर्षे,श्रीशैल्य अत्रे,प्रणव मराठे ह्यांचे व  वायगाव येथील गणेश सुतार ,अशोक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मदतकार्यात सहभागी झाले होते

यामध्ये  घराला लागणारे ताडपत्री व सतरंज्या, ह्या वस्तू वितरित करण्यात आल्या.सुमारे पस्तीस कुटुंबियांना ह्या जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.

अधिक वाचा  युवकाच्या मृत्यूस जबाबदार तपास अधिकारी व मदत करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा : शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी

” गोळेवाडी गावच्या व जवळपासच्या लोकांचे संसार उध्वस्त झाले असून घराचे पत्रे वादळाने उडून गेले,डोंगर कोसळल्यामुळे व पुराच्या पाण्यामुळे रस्ते खचले आहेत,शेती वाहून गेली,पिण्याच्या पाण्याची समस्या, लाईट नाहीत अश्या हलाखीत ही मंडळीत जीवन जगत आहेत समाजातील दानशूर लोकांनी अजून अश्या कार्यात सहभागी व्हावे व संकटात सापडलेल्या ग्रामस्थांना आधार द्यावा” अशी अपेक्षा  Beyond Mountains ट्रेकिंग गृपचे टीम लीडर समीर दिवेकर यांनी व्यक्त केली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love